मिशन ‘चांद्रयान-3’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे एफबी सिंग यांनी केली मोंदींची स्तुती, म्हणाले…
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : ब्रिक्स आणि ग्रीस हा परदेश दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटेच बंगळरुत दाखल झाले. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था “इस्रो”च्या कमांड सेंटरमध्ये जाऊन चांद्रयान-३ च्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आणि भावूक होत भावनाही व्यक्त केल्या. Under the leadership of Modi the country will create miracles ISRO scientists expressed their belief
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नेव्हिगेशन सिस्टम क्षेत्राचे उपमहाव्यवस्थापक आणि ‘चांद्रयान-3’च्या आयोजन समितीचा भाग असणारे एफबी सिंग यांनी म्हटले की, “ते केवळ अद्भूत होते. त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना खूप प्रेरणा दिली आहे. आम्हाला त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे. त्यांनी दूरदृष्टी दिली आहे. इस्रोकडे प्रतिभेची कमतरता नाही आणि आम्हाला गरज आहे ती अशा नेत्याची की जो सक्षम असेल, प्रेरणादी आहे. सध्याचे पंतप्रधान तेच करत आहेत आणि ते आम्हाला चांगले मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देश चमत्कार घडवेल.”
45 मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले, ‘मी दक्षिण आफ्रिकेत होतो, त्यानंतर ग्रीसमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्यात गुंतले होते. मात्र कधी कधी असं वाटतं की, मी तुमच्यावर अन्याय करतोय. माझी अधीरता आणि तुम्हाला त्रास. सकाळी-सकाळी आणि एवढा ऑड टाइम. मला तुमच्यासमोर नतमस्तक व्हायचे होते. पण मला तुम्हाला भारतात येऊन लवकरात लवकर तुम्हाला भेटायचं होतं!!
मोदी म्हणाले, ‘मला तुम्हाला नमन करायचे होते. तुमच्या मेहनतीला सलाम… तुमच्या संयमाला सलाम… तुमच्या जिद्दीला सलाम… तुमच्या चैतन्यला सलाम. तुमच्या आत्म्याला सलाम….चंद्राच्या ज्या भागावर टचडाउन झाले, तो बिंदू आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखला जाईल, असे मोदी म्हणाले.
Under the leadership of Modi the country will create miracles ISRO scientists expressed their belief
महत्वाच्या बातम्या
- नरसिंह राव हिंदुत्ववादी, तर मग सरदार पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, पुरुषोत्तमदास टंडन, के. एम. मुन्शी, कृपलानी हे कोण होते??
- पंतप्रधान मोदी बंगळुरूत पोहोचले, ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांच्या अभिनंदनासाठी कमांड सेंटरमध्ये जाणार!
- ईडीच्या कारवाईला घाबरून तिकडे गेले; पवारांची मुश्रीफांवर नाव न घेता टीका; अजित पवारांचेही नाव टाळले!!
- ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानाच्या शिबिराला भरघोस प्रतिसाद