• Download App
    लोकसभा अध्यक्षांच्या वाहन ताफ्यात घुसली अनियंत्रित बस; एस्कॉर्ट कारला धडक, तीन पोलीस जखमी Uncontrolled  bus rammed into Lok Sabha Speakers convoy Escort car hit three policemen injured

    लोकसभा अध्यक्षांच्या वाहन ताफ्यात घुसली अनियंत्रित बस; एस्कॉर्ट कारला धडक, तीन पोलीस जखमी

    बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, जखमी पोलिसांवर उपाचार सुरू

    विशेष प्रतिनिधी

    कोटा : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे सध्या राजस्थानच्या कोटा दौऱ्यावर आहेत. रविवारी इटावा येथे क्रीडा महोत्सवाला जात असताना त्यांच्या ताफ्यातील पोलीस एस्कॉर्ट वाहन आणि सार्वजनिक वाहतूक बसची धडक झाली. या अपघातात ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. कोटाचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कविंदर सिंग यांनी याला दुजोरा दिला आहे. Uncontrolled  bus rammed into Lok Sabha Speakers convoy Escort car hit three policemen injured

    रुग्णवाहिका चालक हाजी मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक वाहतूक बस इटावाकडून येत होती. तर,वाहन ताफा कोटा येथून जात होता. या गाडीच्या ताफ्यात पोलीस एस्कॉर्ट बोलेरो गाडी होती. यादरम्यान मारवाडा चौकी येथे एस्कॉर्ट वाहनाला बसने धडक दिली. या अपघाताबाबत, बसचे ब्रेक निकामी झाल्याचे समोर येत आहे.

    घटना घडताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या ताफ्यात असलेल्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी संपूर्ण टीमवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर ताफ्याला पुढील मार्गासाठी परत पाठवण्यात आले, तर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी एमबीएसमध्ये पाठवण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच कैथून पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले असून, बस चालकासह बसही ताब्यात घेण्यात आली असून कारवाईही सुरू करण्यात आली आहे.

    Uncontrolled  bus rammed into Lok Sabha Speakers convoy Escort car hit three policemen injured

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!