न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर उमेश पाल यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रियाही समोर आली आहे, जाणून घ्या काय म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील उमेश पालच्या अपहरणाच्या १७ वर्षे जुन्या प्रकरणात प्रयागराजचे एपी, एमएलए न्यायालयाने माफियातून राजकारणी झालेल्या अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय तिन्ही आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. Umesh Pal kidnapping case Prayagraj MP MLA Court sentences mafia Atiq Ahmed to life imprisonment
न्यायालयाने या प्रकरणात अतिक अहमद, दिनेश पासी आणि खान शौकत हनिफ यांना दोषी ठरवले आहे. तर अतिक अहमदचा भाऊ अश्रफसह इतर सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले की, आज राज्यातील मुख्य माफिया अतिक अहमदला पहिल्यांदाच कोणत्याही प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. उमेश पाल यांच्या अपहरण प्रकरणात आज न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तीनही आरोपींना जन्मठेपेसह प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरोपींमध्ये अतिक अहमद, खान शौकत हनिफ आणि दिनेश पासी यांचा समावेश आहे.
बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्येप्रकरणी साक्षीदार असलेल्या उमेश पालचे अपहरण करण्यात आले होते. त्यांना हाणामारीही झाली होती. २००६ मध्ये पोलिसात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात सुरू होते.
‘’माझ्या मुलाचे अपहरण केल्याबद्दल त्याला (अतीक अहमद) जन्मठेपेची शिक्षा झाली. पण माझ्या मुलाच्या हत्येसाठी त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास आहे.’’ अशी प्रतिक्रिया उमेश पाल यांची आई शांती देवी यांनी दिली.
तर, ‘’आत्तापर्यंतच्या निकालावर आम्ही समाधानी आहोत. माझ्या पतीच्या हत्येप्रकरणी अतिक अहमदला फाशीची शिक्षा द्यावी. आम्हाला न्याय हवा आहे आणि मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मदत करण्याची विनंती करते. जर तो आणि त्याचा भाऊ जगला तर तो आमच्यासाठी आणि समाजासाठी अडचण निर्माण करणारा ठरेल.’’ अशी प्रतिक्रिया उमेश पाल यांची पत्नी जया देवी यांनी दिली आहे.
Umesh Pal kidnapping case Prayagraj MP MLA Court sentences mafia Atiq Ahmed to life imprisonment
महत्वाच्या बातम्या
- सावरकर मुद्द्यावर शिवसेनेशी मतभेद; पण महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी तेच काँग्रेसकडे आले; अशोक चव्हाणांचे शरसंधान
- ‘’मुंबई महानगरपालिकेतील ८ हजार ४८५ कोटींच्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करा’’ आशिष शेलारांनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठवले पत्र!
- भगतसिंह कोश्यारींचा हेतू महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, तर समाजप्रबोधनाचा होता – मुंबई उच्च न्यायालय
- ‘’जीवनात हीच कामं आपल्याला आशीर्वादरूपी मदत करतात’’ म्हणत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केल्या भावना!