वृत्तसंस्था
नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिद याने दिल्ली दंगलीदरम्यान अमरावतीत केलेले भाषण घृणास्पद, भडकाऊच होते. दिल्ली दंगलीच्या मोठ्या कट कारस्थानातील तो एक भाग होते. ते भाषण अस्वीकार्यच होते, अशा कडक शब्दांत दिल्ली हायकोर्टाने ताशेऱे ओढले आहेत. Umar Khalid’s speech ‘obnoxious, inciteful, unacceptable’, says Delhi HC
उमर खालिद गेल्या १८ महिन्यांपासून तुरुंगात आहे. त्याच्या जामीनअर्जावर सुनावणी दरम्यान दिल्ली हायकोर्टाने कडक ताशेरे ओढून दिल्ली पोलीसांना उमर खालिदच्या जामीन अर्जावर येत्या ३ दिवसांत आपले निवेदन सादर करण्याचे आदेश दिले.
दिल्ली दंगलीच्या वेळी उमर खालिद दिल्लीत हजरच नव्हता. त्याच्या फक्त एका भाषणावरून दिल्ली पोलीसांनी त्याला अटक केली आहे, असा दावा खालिदच्या वकीलांनी केला. मात्र, उमर खालिदच्या त्याच भाषणावर आक्षेप घेताना हायकोर्टाच्या खंडपीठाने काही तिखट सवाल केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात एकच पक्ष होता का…?? एकाच पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले का…?? शहीद भगतसिंग आणि महात्मा गांधी अशी भडकाऊ भाषा कधी वापरली होती का…??, असे सवाल करून दिल्ली हायकोर्टाच्या खंडपीठाने उमद खालिदचे भाषण भडकाऊ आणि दंगलीचे कारस्थान रचणारेच होते, असे ताशेरे ओढले.
उमर खालिदच्या जामीन अर्जावर दिल्ली पोलीसांनी ३ दिवसांमध्ये आपले म्हणणे सादर केल्यानंतर हायकोर्ट निर्णय देणार आहे.
Umar Khalid’s speech ‘obnoxious, inciteful, unacceptable’, says Delhi HC
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र पोलीस बदल्या : निर्णय फिरवणारे आघाडीचे “अण्णा नाईक”, “पांडू” आणि “शेवंता” कोण??; आशिष शेलारांचा खोचक सवाल
- मुंबई हायकोर्टाने नारायण राणेंना करून दिली संतवचनाची आठवण; पण कारवाईस पोलिसांना प्रतिबंधही!!
- Raj Thackeray : संभाजीनगरची सभा, पोलिसांची विनंती आणि चंद्रकांत खैरेंच्या म्हणण्यानुसार भाड्याची माणसे!!