• Download App
    Umar Abdullah 86 वर्षांच्या फारूक अब्दुल्लांनी केले उमर अब्दुल्लांना मुख्यमंत्री; 84 वर्षांच्या शरद पवारांच्या कन्येच्या आशा पल्लवीत!!

    Umar Abdullah : 86 वर्षांच्या फारूक अब्दुल्लांनी केले उमर अब्दुल्लांना मुख्यमंत्री; 84 वर्षांच्या शरद पवारांच्या कन्येच्या आशा पल्लवीत!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये फारूक अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सने गांधी परिवाराच्या काँग्रेस पक्षाशी युती करून विधानसभेची निवडणूक एकहाती जिंकली. दोन्ही पक्षांच्या युतीचा नॅशनल कॉन्फरन्सला जास्त फायदा होऊन 42 जागा मिळाल्या. पण काँग्रेसला फक्त 6 जागांवर समाधान मानावे लागले. निकाल आल्याबरोबरच 86 वर्षांच्या फारूक अब्दुल्लांनी उमर अब्दुल्लांना मुख्यमंत्री जाहीर करून टाकले. पण त्याचा परिणाम महाराष्ट्रात होऊन 84 वर्षांच्या शरद पवारांच्या कन्येच्या अशा पल्लवीत झाल्या.

    जम्मू काश्मीर मधल्या विजयाबद्दल अब्दुल्ला परिवाराचे अभिनंदन करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी फारूक अब्दुल्लांच्या 86 वय वर्षाचा आवर्जून उल्लेख केला. फारुख अब्दुल्ला 86 वर्षांचे आहेत. शरद पवार 84 वर्षांचे आहेत, पण ते ज्या पद्धतीने स्वतः पुढाकार घेऊन राजकीय लढाई लढतात, हा आमच्यासारख्या नेत्यांसाठी आदर्श आहे. मी अब्दुल्ला परिवाराचे जम्मू काश्मीर मधल्या विजयाबद्दल अभिनंदन करते असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.


    Haryana result : हरियाणाच्या निकालात भाजपच्या बहुमताच्या पुढे, इकडे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ


    जम्मू काश्मीरचे निकाल समोर येताच फारूक अब्दुल्लांनी उमर अब्दुल्लांना ताबडतोब मुख्यमंत्री म्हणून जाहीर करून टाकले. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या महाराष्ट्रात आशा पल्लवीत झाल्या, हेच त्यांच्या वक्तव्यामधून समोर आले.

    तसेही अब्दुल्ला परिवार आणि पवार परिवाराचे जुने संबंध आहेत. उमर अब्दुल्ला मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते शरद पवारांच्या घरी राहात होते. तेव्हापासून सुप्रिया सुळे आणि उमर अब्दुल्ला यांची मैत्री आहे. आता उमर अब्दुल्ला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

    Umar Abdullah new cm of jammu kashmir

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Central Motor Vehicles Rules : राष्ट्रीय महामार्गांवर टोलचे नियम कडक- टोल थकबाकीदार गाडी विकू शकणार नाहीत, NOC आणि फिटनेस प्रमाणपत्र जारी केले जाणार नाही

    Supreme Court : कर्नल सोफिया अपमानप्रकरणी SCने MPच्या मंत्र्याला फटकारले, म्हटले- माफी मागण्यात उशीर झाला

    Delhi HC : HCचा कुलदीप सेंगरच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार; उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या न्यायिक कोठडीतील मृत्यू प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा