विशेष प्रतिनिधी
मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये फारूक अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सने गांधी परिवाराच्या काँग्रेस पक्षाशी युती करून विधानसभेची निवडणूक एकहाती जिंकली. दोन्ही पक्षांच्या युतीचा नॅशनल कॉन्फरन्सला जास्त फायदा होऊन 42 जागा मिळाल्या. पण काँग्रेसला फक्त 6 जागांवर समाधान मानावे लागले. निकाल आल्याबरोबरच 86 वर्षांच्या फारूक अब्दुल्लांनी उमर अब्दुल्लांना मुख्यमंत्री जाहीर करून टाकले. पण त्याचा परिणाम महाराष्ट्रात होऊन 84 वर्षांच्या शरद पवारांच्या कन्येच्या अशा पल्लवीत झाल्या.
जम्मू काश्मीर मधल्या विजयाबद्दल अब्दुल्ला परिवाराचे अभिनंदन करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी फारूक अब्दुल्लांच्या 86 वय वर्षाचा आवर्जून उल्लेख केला. फारुख अब्दुल्ला 86 वर्षांचे आहेत. शरद पवार 84 वर्षांचे आहेत, पण ते ज्या पद्धतीने स्वतः पुढाकार घेऊन राजकीय लढाई लढतात, हा आमच्यासारख्या नेत्यांसाठी आदर्श आहे. मी अब्दुल्ला परिवाराचे जम्मू काश्मीर मधल्या विजयाबद्दल अभिनंदन करते असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.
जम्मू काश्मीरचे निकाल समोर येताच फारूक अब्दुल्लांनी उमर अब्दुल्लांना ताबडतोब मुख्यमंत्री म्हणून जाहीर करून टाकले. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या महाराष्ट्रात आशा पल्लवीत झाल्या, हेच त्यांच्या वक्तव्यामधून समोर आले.
तसेही अब्दुल्ला परिवार आणि पवार परिवाराचे जुने संबंध आहेत. उमर अब्दुल्ला मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते शरद पवारांच्या घरी राहात होते. तेव्हापासून सुप्रिया सुळे आणि उमर अब्दुल्ला यांची मैत्री आहे. आता उमर अब्दुल्ला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Umar Abdullah new cm of jammu kashmir
महत्वाच्या बातम्या
- Haryana result : हरियाणाच्या निकालात भाजपच्या बहुमताच्या पुढे, इकडे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ
- Anil Vij : हरियाणात भाजपच्या मुसंडीवरून अनिल विज यांचा हुड्डांना टोला, म्हणाले…
- Chhattisgarh Story : हरियाणात छत्तीसगडची स्टोरी रिपीट; काँग्रेस सकट एक्झिट पोलला धोबीपछाड देत भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर!!
- Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री शहा यांची नक्षलवाद संपवण्याबाबत बैठक; वर्षभरात छत्तीसगडमध्ये 194 नक्षलवादी ठार