प्रतिनिधी
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन यांच्या दरम्यान सुरु असलेल्या घनघोर युद्धामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तातडीने मायदेशात आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. मात्र एअर इंडियाच्या विमानातून तितक्या मोठ्या संख्येने भारतीयांना घेऊन येता येत नाही, त्यामुळे अखेर भारताने सक्षम हवाई दलाची मदत घेतली आहे.Ukraine Indian students
एकाच वेळी जिथे 102 प्रवाशांना घेऊन येता येथे तिथे भारताने आता “सी 17” विमान या गंगा ऑपरेशनसाठी उतरवले आहे, ज्यामुळे एकाच वेळी 336 भारतीयांना भारतात घेऊन येत येणार आहे. या विमानामुळे एकाच वेळी अधिक संख्येने प्रवासी भारतात आणता येऊ शकतात. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सोडवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने बैठका घेत आहेत, त्यातच पंतप्रधान मोदी यांनी “ऑपरेशन गंगा”मध्ये “सी 17” विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. हे विमान एकाच फेरीत 10 हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते.
Ukraine Indian students
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिरे आमच्या समाजाच्या धारणेची साधने, त्यामुळेच एका मंदिरासाठी उभे राहिले मोठे आंदोलन, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
- घराणेशाही वाद्यांनी फक्त आपल्या तिजोऱ्या भरल्या, पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल
- इतिहासातील काही तथ्ये मला लोकांनी सांगितली, मी ती तपासून घेईल, समर्थ रामदास वादाबाबत राज्यपालांनी स्पष्ट केली भूमिका
- छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट, पत्नीने माझ्यावर गनिमी कावा करत स्वत;ही उपोषण केले