• Download App
    बीकेसीतील सभेसाठी मातोश्रीबाहेर!!; आजच्या सभेनंतर मुंबई बाहेर!! Uddhav Thackeray: Matoshri out for meeting in BKC

    उद्धव ठाकरे : बीकेसीतील सभेसाठी मातोश्रीबाहेर!!; आजच्या सभेनंतर मुंबई बाहेर!!

    • शिवसेना पक्षप्रमुखांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची आखणी

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या सभेसाठी मातोश्रीबाहेर आणि आजच्या सभेनंतर मुंबईबाहेर अर्थात उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची आखणी शिवसेना करत आहे. Uddhav Thackeray: Matoshri out for meeting in BKC

    उद्धव ठाकरे शनिवारी, १४ मे रोजीच्या जाहीर सभेनंतर ते शिवसेना पक्ष बांधणीसाठी पुन्हा नव्या उत्साहात सक्रिय होणार आहेत. ते राज्याचा दौरा करणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी उद्धव शिवसेना पुन्हा ताकद वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत.

    मागील दीड वर्षे कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडलेच नाहीत. मातोश्री आणि वर्षा बंगल्यात राहूनच त्यांनी राज्याचा कारभार पाहिला. विरोधकांनी त्यांच्यावर घरकोंबडा म्हणून शरसंधान साधले होते. आता ते आजच्या जाहीर सभेपासून राज्याच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. या दरम्यान ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या भेटीगाठी घेतील. त्यांच्या समस्या जाणून घेतील. सोबतच शिवसैनिकांसोबत संवाद साधतील.

    – राज्यभर सभा घेणार 

    मुंबईत शिवसेनेची बीकेसी येथे सभा होत आहे. या सभेतून मुख्यमंत्री ठाकरे भाजप आणि मनसेचा समाचार घेण्याची सभा आहे. भाजप आणि मनसे सातत्याने शिवसेनेची हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करत आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा समाचार मुख्यमंत्री ठाकरे आजच्या सभेतून घेऊ शकतात.

    आजच्या सभेनंतर मुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत. त्याची तयारी शिवसेनेकडून सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे राज्यभरात फिरतील. लोकांच्या समस्या जाणून घेतील. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसी संवाद साधतील. त्यासाठी विभागवार नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

    Uddhav Thackeray: Matoshri out for meeting in BKC

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mamata Banerjee : भाजपची सरकारे असलेल्या राज्यांत बंगाली लोकांच्या छळाविरुद्ध मोर्चा; बंगालींचा छळ अमान्य- ममता

    Operation Sindoor : 239 वेबसाइटवर 2 लाख सायबर हल्ले;‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरच्या सायबर हल्ल्यापासून 99 सरकारी संकेतस्थळे अद्यापही बंद

    ‘Ajey’ film : योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय’ चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीअभावी अडकला