विशेष प्रतिनिधी
मुंबई : संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी भगव्या ध्वजाजा अपमान करत हिंदुत्वाविरुद्ध टीव्ही 9 च्या मुलाखतीत गरळ ओकली. Uddhav thackeray insults saffron flag in the name of RSS
याच मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिव्यांची लाखोली वाहिली.
उद्धव ठाकरे म्हणाले :
- शिवसेनेचे मिंधे हा या निवडणुकीत विषय होऊ शकत नाही. त्यांची योग्यता नाही. ते फक्त कठपुतली आहेत. आम्ही भाजपसोबतच होतो. 25 ते 30 वर्षे भाजपसोबत होतोच ना, कसे वागले ते?? तुम्ही अडीच वर्ष भोगलंत ना सगळं!! म्हणून मला कठपुतळ्यांबद्दल बोलायचं नाही.
- मोदींनी माझ्या तब्येतीची काळजी फोनवरुन घेतल्याचे सांगत आहेत. त्यावेळेचे फोन रेकॉर्डेड नाहीत. पण मोदी जेव्हा फोन करीत होते तेव्हा तुमचे लोकं माझ्याविरोधात कारस्थानं का करत होती?? त्यावेळी माझी परिस्थिती अत्यंत वाईट होती. खांद्यापासून माझी हालचाल बंद झाली होती. त्यावेळी मोदी माझी चौकशी करत असतील तर त्यांना माहिती होते. त्यामुळे तुमचे लोकं माझ्याविरोधात त्यावेळी गद्दारीची कारस्थानं का करत होती? हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम? त्यांचेच लोक म्हणत आहेत की, रात्री हुडी घालून गॉगल घालून जायचे. ते कशासाठी जायचे??
- परवा मोदींनी वाराणसीतून निवडणुकीचा अर्ज भरला. त्यावेळी त्यांची मुलाखत घेतली. 2014 मध्ये गंगा माँ ने बुलाया था. आता गंगा माँने मला दत्तक घेतलं, असं मोदी म्हणाले. त्या गंगेत कोरोनाच्या काळात प्रेते तरंगली. तेव्हा गंगेचे अश्रू का पुसले नाहीत?? का तिचे अश्रू पाहिले नाहीत?? काही तरी बोलत आहेत.
- डॉ. बाबासाहेबांवरचा त्यांचा राग आहे. तो दोन कारणासाठी आहे,एक तर महाराष्ट्रात जन्मलेला माणूस आणि दलित कुटुंबात जन्मलेला विद्वान माणूस त्यांना खटकत आहे. त्यांच्याबद्दलचा द्वेष आहे. म्हणूनच ते संविधान बदलत आहेत. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कशी मानायची?? म्हणून त्यांना घटना बदलायची आहे. जे. पी. नड्डा बोलले की देशात एकच पक्ष राहील. पूर्वी एक विधान, एक निशाण एक प्रधान म्हणाले. आम्हाला वाटलं होतं की ते तिरंग्यासाठी करत आहेत. पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकत नव्हता. संघाचं फडकं फडकत होतं. ते संघाचं फडकं देशाचं निशाण नाही होऊ शकत. आमच्या देशाचा तिरंगा हा तसाच राहणार. संविधान तसंच राहणार. प्रधान लोकांनी निवडून दिलेलाच राहणार. पुतीन सारखा निवडून येणार नाही.
- मला चिंता आहे की, 4 जूनला सरकार जातंय. त्या दिवशी अर्धा भाजप तिथेच फुटेल. परत पंतप्रधानपद गेलेलं असेल. त्यांनी 75 वर्षांची अट टाकलेली आहे. दोन वर्षांनी मोदी रिटायर होणार. मग भाजपचं काय होईल.? एक जमाना असा होता, की अटलबिहारींचा पराभव झाला होता. दोनच खासदार भाजपचे होते. पुन्हा 302 वरून दोन झाले तर काय करतील भाजपवाले?? यांना कुठे विलीन व्हायला पक्षही राहणार नाही. यांना कोणीही घेणार नाही.