वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशात आजच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भाजप, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष यांच्या नेत्यांनी बडे बडे दावे केले आहेत. राज्यात 59 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. यामध्ये प्रामुख्याने वाराणसी सह पूर्वांचलातील 59 मतदारसंघांचा समावेश आहे. U. P. Elections: BJP, Samajwadi, BSP leaders win in the last phase of voting in Uttar Pradesh – “Rana Bhimdevi claims” of defeat !!
उत्तर प्रदेशात मोदी आणि योगी यांच्या डबल इंजिन सरकारची जादू चालली आहे. भाजप 325 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री राम शंकर तिवारी यांनी केला आहे, तर दुसरीकडे मोदी आणि योगी यांचे डबल इंजिन सरकार पूर्णपणे फेल झाले आहे. उत्तर प्रदेशात भाजप 100 – 150 जागांच्या आतच गुंडाळला जाईल, असा दावा बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांनी केला आहे. तर तिसरीकडे समाजवादी पार्टी आणि सोहेल देव समाज पक्ष यांच्या युतीचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी पूर्वांचल मध्ये भाजप 59 पैकी एकही जागा जिंकू शकणार नाही. वाराणसी मध्ये समाजवादी पार्टी आणि सोहेल देव समाज पक्ष युती 8 पैकी 6 जागा जिंकेल. पूर्वांचल मध्ये मऊ, गाजियाबाद, गाजीपूर या क्षेत्रांमध्ये भाजपचे कोणतेही स्थान उरणार नाही, असा दावा केला आहे आहे.
आज सायंकाळी पाच वाजता मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोलचे आकडे बाहेर येतील. परंतु, या एक्झिट पोलच्या आकड्यांच्या आधीच भाजपा समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष यांच्या नेत्यांनी बडे बडे दावे करून घेतले आहेत.
U. P. Elections : BJP, Samajwadi, BSP leaders win in the last phase of voting in Uttar Pradesh – “Rana Bhimdevi claims” of defeat !!
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशातील ८० विरुध्द २० ची लढाई, योगी आदित्यनाथ यांचा ३२५ जागा जिंकण्याचा दावा
- दिल्लीमध्ये चालणार पहिली हायड्रोजन कार, नितीन गडकरी यांची माहिती
- पुण्यात मेट्रोचे उद्घाटनही झाले, पण मुंबईत बेबी पेंग्विन अजून जागा शोधताहेत, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- पिंपरीत देवेंद्र फडणवीसांच्या गाड्यांवर राष्ट्रवादीची चप्पलफेक, नितेश राणेंचा राष्ट्रवादीला जशास तसेचा इशारा