• Download App
    U. P. BJP - BSP : स्वामी प्रसाद मौर्य यांनी योगी - मायावतींवर काढला राग; म्हणाले साप - कोब्रा नागाने एक होत मुंगसाला हरविले!! । U. P. BJP - BSP: Swami Prasad Maurya lashes out at Yogi - Mayawati; Said the snake - the cobra cobra became one and defeated the mongoose !!

    U. P. BJP – BSP : स्वामी प्रसाद मौर्य यांनी योगी – मायावतींवर काढला राग; म्हणाले साप – कोब्रा नागाने एक होत मुंगसाला हरविले!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेले नेते स्वामी प्रसाद मौर्य उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक 11 हजार मतांनी हरले. त्यानंतर त्यांनी आपला सगळा संताप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर काढला. साप आणि कोब्रा नागाने एकत्र येऊन मुंगसाला हरविले, अशा भाषेत त्यांनी योगी आणि मायावती यांच्यावर आगपाखड केली. U. P. BJP – BSP: Swami Prasad Maurya lashes out at Yogi – Mayawati; Said the snake – the cobra became one and defeated the mongoose !!

    स्वामी प्रसाद मौर्य यांनी 5 वर्षे योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात राहिल्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. फाजील नगर या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून अखिलेश यादव यांनी त्यांना समाजवादी पक्षाचे तिकीट दिले होते. त्यांनी भाजप विरुद्ध जोरदार प्रचारही केला होता. परंतु स्वामी प्रसाद मौर्य यांना 11 हजार मतांनी पराभव याचा धक्का बसला. या धक्क्यातून ते अजून सावरलेले नाहीत.



    आज वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी प्रसाद मौर्य यांनी योगी आणि मायावती यांच्या तथाकथित छुप्या युतीवर आगपाखड केली. स्वामी प्रसाद मोरे म्हणाले, की खरं म्हणजे लढाईत कायम मुंगूस जिंकत असते. पण यावेळी साप आणि कोब्रा नाग यांनी एकत्र येऊन मुंगसाला जिंकू दिले नाही. निवडणुकीत पराभव झाला असला तरी आपण समाजवादी पक्षात कार्यरत राहणार असून अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

    काशीराम यांची भाषा स्वामी प्रसादांच्या तोंडी

    उत्तर प्रदेशात विरोधकांना साप – नाग म्हणण्याची प्रथा नवीन नाही. एकेकाळी मायावतींचे बॉस आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांनीदेखील भाजप आणि काँग्रेस या दोन्ही त्यावेळच्या बळकट पक्षांना सापनाथ आणि नागनाथ असेच म्हणून घेतले होते. स्वामी प्रसाद मौर्य हे एकेकाळी बहुजन समाज पक्षात होते. मायावतींच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भोगले आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडी काशीराम यांचीच भाषा रुळलेली आहे. तीच भाषा आज साप आणि कोब्रा नाग – मुंगुस या भाषेच्या रुपाने प्रकट झालेली दिसली आहे.

    U. P. BJP – BSP: Swami Prasad Maurya lashes out at Yogi – Mayawati; Said the snake – the cobra became one and defeated the mongoose !!

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य