विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेवरील हल्ल्याच्या स्मृतिदिनीच नव्या संसदेत अत्यंत गंभीर घटना घडली. लोकसभेत सुरक्षेचा भंग करून दोन युवकांनी प्रेक्षक गॅलरीतून मुख्य सभागृहात उड्या मारल्या. सदस्यांच्या आसनांवरून उड्या मारत ते सभापतींच्या दिशेने गेले, पण लोकसभेतील सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेळीच पकडले.
त्यांनी हातातल्या वस्तूंनी लोकसभेत काही गॅस पसरविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी ताबडतोब लोकसभेची कार्यवाही दुपारी 2.00 वाजेपर्यंत स्थगित केली या संदर्भात माहितीची प्रतीक्षा आहे.
नव्या संसदेचे उद्घाटन होऊन पहिल्याच नियमित कामकाजाच्या अधिवेशनात सुरक्षेचा भंग झाल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या स्मृतिदिनी हा प्रकार घडल्याने सुरक्षा विषयी मोठी चिंता निर्माण झाली आहे.
Two youths jumped into the hall from the audience gallery in sansad
महत्वाच्या बातम्या
- देशात काँग्रेस असताना वेगळ्या Money Heist फिक्शनची गरजच काय??; पंतप्रधान मोदींचा निशाणा!!
- राज्य मागासवर्ग आयोगातून राजीनामा सत्र; पण ताबडतोब नव्या नियुक्त्या; अध्यक्षपदी न्या. सुनील शुक्रे; तीन सदस्यही नेमले!!
- पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ल्यात 23 जणांचा मृत्यू, पोलीस स्टेशनची इमारत कोसळली
- ”देशात राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांची आकडेवारी गोळा करणे अशक्य”