युगांडाच्या दोन महिला प्रवाशांकडून त्यांच्या तीन सुटकेसमधून एकूण १२.९ किलो क्रिस्टलिन हेरॉईन जप्त करण्यात आली.Two Ugandan women passengers arrested in Delhi; 12.9 kg heroin seized
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नवी दिल्ली मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांनी मोठी कारवाई केली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने तब्बल १२.९ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.याची किंमत ९० कोटींपर्यंत जात आहे. याप्रकरणी केनिया येथून युगांडाच्या दोन महिला प्रवाश्यांना अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहतीनुसार युगांडाच्या दोन महिला प्रवाशांकडून त्यांच्या तीन सुटकेसमधून एकूण १२.९ किलो क्रिस्टलिन हेरॉईन जप्त करण्यात आली. गेल्या वर्षभरात दिल्ली सीमाशुल्क विभागाने १०० किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केली आहे. २६ हून अधिक तस्कारांना अटक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Two Ugandan women passengers arrested in Delhi; 12.9 kg heroin seized
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचे राजकारण गुन्हेगारीकडे जात आहे- नाना पटोले
- “कोण म्हणतं देत नाय, आन घेतल्याशिवाय राहत नाय! कामगार एकजुटीचा विजय असो” – चित्रा वाघ
- एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा पाचवा दिवस , मंत्रालयाच्या समोर आत्मदहन आंदोलन
- पश्चिम बंगाल हिंसा : पुन्हा एका भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, तृणमूलवर आरोप, एका महिन्यातील दुसरी घटना