Wednesday, 7 May 2025
  • Download App
    उरीमध्ये लष्कराला मोठे यश दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा!|Two terrorists were killed by the Indian army in Uri

    उरीमध्ये लष्कराला मोठे यश दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा!

    सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू


    विशेष प्रतिनिधी

    काश्मीर : लष्करी जवान आणि संयुक्त सुरक्षा दलांनी शनिवारी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील गोहलन भागात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उरीजवळ दोन दहशतवाद्यांना ठार करण्यातही सुरक्षा दलांना यश आले आहे. दोघेही घुसखोरीचा प्रयत्न करत होते. सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.Two terrorists were killed by the Indian army in Uri

    मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सुरक्षा दल त्यांची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत. याआधी बुधवार, 21 जून रोजी बालमुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दोघेही लश्कर-ए-तैयबाशी संबंधित होते.



    पाकिस्तान उत्तर काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद सक्रिय करण्याचा कट रचत आहे. 2005 ते 2015 या काळात या भागात दहशतवाद पसरला. तथापि, 2019 मध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी बारामुल्ला जिल्ह्याला दहशतवादमुक्त घोषित केले होते. सुरक्षा यंत्रणांच्या मते, पाकिस्तानी वंशाच्या परदेशी दहशतवाद्यांची संख्या सध्या स्थानिक दहशतवाद्यांपेक्षा जास्त आहे, मात्र त्यांचा खात्मा केला जात आहे.

    अमरनाथ यात्रेसाठी जम्मू-काश्मीरमध्ये निमलष्करी दलाची तैनाती सुरू करण्यात आली आहे. जम्मू जिल्ह्याला यावेळी निमलष्करी दलाच्या 24 अतिरिक्त कंपन्या मिळाल्या आहेत, ज्या गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सहा अधिक आहेत. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर प्रथमच तैनाती, यात्रेकरूंची थांबे, लंगर आणि इतर ठिकाणी तैनात करण्याव्यतिरिक्त, ज्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी निमलष्करी दल देखील तैनात केले जात आहेत.

    Two terrorists were killed by the Indian army in Uri

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : पाकिस्तानातल्या 21 दहशतवादी अड्ड्यांवर भारताचे हल्ले, कसाब + हेडलीने प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी केंद्रही उद्ध्वस्त, प्रथमच महिला अधिकाऱ्यांचे ब्रीफिंग!!

    Nitin Gadkari : रस्ते अपघातातील जखमींवर तातडीने मोफत उपचार; दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचारांचा लाभ

    Indian Army भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील कोणती 9 ठिकाणे उद्ध्वस्त केली?