वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अल्शिपोरा, शोपियान येथे लष्कराच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मोरीफत मकबूल आणि जाजीम फारुक ऊर्फ अबरार अशी त्यांची नावे आहेत. दोघेही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.Two terrorists killed in army encounter in Jammu and Kashmir; Was associated with Lashkar-e-Taiba
काश्मीरचे सहायक पोलीस महासंचालक म्हणाले की, काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्या हत्येत दहशतवादी अबरारचा हात होता. परिसरात मोठ्या प्रमाणात लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आणखी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.
फेब्रुवारीत झाली होती संजय शर्मा यांची हत्या
26 फेब्रुवारी रोजी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी संजय शर्मा या काश्मिरी पंडितावर गोळ्या झाडल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 40 वर्षीय संजय सकाळी 10.30 वाजता पत्नीसह बाजारात जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
संजय हे आचन गावचे रहिवासी होते. ते बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते. ऑक्टोबर 2022 नंतर काश्मीर खोऱ्यातील ही पहिलीच टार्गेट किलिंग होती. काश्मीर फ्रीडम फायटर्स नावाच्या दहशतवादी संघटनेने संजय यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती.
या संघटनेने एक संदेश जारी केला होता की, आज सकाळी आम्ही आचन (पुलवामा) येथील काशिनाथ शर्मा यांचा मुलगा संजय शर्मा याला संपवले. काश्मिरी पंडित, हिंदू आणि भारतातील पर्यटक येथे उद्ध्वस्त होतील, असा इशारा आम्ही यापूर्वीही अनेकदा दिला आहे.
Two terrorists killed in army encounter in Jammu and Kashmir; Was associated with Lashkar-e-Taiba
महत्वाच्या बातम्या
- न्यूजक्लिकप्रकरणी प्रबीर-अमित यांच्या याचिकेवर HCचा निर्णय राखीव; UAPA अंतर्गत झाली अटक
- WATCH : चीननेच घडवली अतिरेकी निज्जरची हत्या, अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दाव्याने खळबळ
- छत्तीसगडसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी; तीन खासदारांना तिकीट
- परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, सप्तश्रृंगी गडासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 531 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा!!