परिसरात अद्यापही चकमक सुरू , उत्तर काश्मीरमधील बारामुल्लाच्या हदीपोरामध्ये संशयित दिसले
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. बुधवारी (आज) सकाळी दहशतवाद्यांच्या ठिकाणांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी बारामुल्ला जिल्ह्यातील वाटरगाम भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.Two terrorists killed by security forces in Sopore, one jawan injured
हदीपोरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सकाळपासून शोध मोहीम सुरू केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यानंतर दोघांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्याचवेळी एक सुरक्षा कर्मचारीही जखमी झाला.
दहशतवादी हल्ल्यानंतर आज उत्तर काश्मीरमधील बारामुल्लाच्या हदीपोरामध्ये संशयित दिसले. दहशतवादी लपल्याच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली होती. परिसरात दहशतवादी लपून बसल्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महाविद्यालय बंद केले आहे.
याआधी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक सुरू झाली.
Two terrorists killed by security forces in Sopore, one jawan injured
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार