• Download App
    काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले Two terrorist died in gun battel

    काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर – सुरक्षा दलाने काश्मीरात दोन व्यापारी आणि दोन दहशतवादी अशा चार व्यक्तींना ठार मारले. दोन्ही व्यापारी दहशतवाद्यांचे पाठिराखे होते. Two terrorist died in gun battel

    डॉ. मुदासीर गुल आणि अल्ताफ भट अशी व्यापाऱ्यांची नावे आहेत. हैदरपोरा येथील व्यापारी संकुलात त्यांची दुकाने होती. डॉ. गुल हा दंतवैद्यक होता. तो संगणक केंद्रही चालवायचा. अल्ताफ हा संकुलाचा मालक होता. हार्डवेअरचे एक आणि सिमेंट एक दुकानही तो चालवायचा.


    पुस्तक वादावर सलमान खुर्शीद यांचे स्पष्टीकरण, म्हणाले- हिंदुत्वाला कधीही दहशतवादी संघटना म्हटले नाही!


    दरम्यान, सुरक्षा दलाने व्यापाऱ्यांना मारल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्यांचे मृतदेह दफनविधीसाठी ताब्यात मिळावेत अशी मागणीही त्यांनी केली. साईमा भट हिने ट्विट द्वारे आरोप केला की आपल्या निरपराध काकांचा थंड डोक्याने खून करण्यात आला.

    पोलिसांनी मात्र व्यापारी दहशतवाद्यांच्या गोळीबारात किंवा चकमकीत मारले गेल्याचे ठामपणे सांगितले. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता मृतदेह ताब्यात देता येणार नाहीत असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

    श्रीनगरपासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तर काश्मीरमधील हंदवाडा येथे चार पार्थिवांचा दफनविधी झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

    Two terrorist died in gun battel

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan drones : पाकिस्तानचे सर्व ड्रोन उद्ध्वस्त, १०० हून अधिक दहशतवादी ठार

    Karachi port : कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल होते सज्ज

    ‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान