• Download App
    काय सांगता! मुख्यमंत्र्यांची सुरक्षा करणाऱ्या अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर चोरीला, पोलिसांची उडाली तारांबळ । Two revolvers stolen from the officer protecting CM Mamta, the Bengal Police lost their senses

    काय सांगता! मुख्यमंत्र्यांची सुरक्षा करणाऱ्या अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर चोरीला, पोलिसांची उडाली तारांबळ

    पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीएम ममता बॅनर्जी यांचे संरक्षण करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबतच चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे रिव्हॉल्व्हरच चोरले. रिपोर्टनुसार, फक्त रिव्हॉल्व्हरच नाही तर मोबाईल फोन आणि बॅगेत असलेले काही पैसेही गायब आहेत. ही घटना कूचबिहारमधील आहे. बुधवारी आसाममधून ट्रेनमधून परतणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची बॅग बेपत्ता झाली. या बॅगेत सुरक्षा कर्मचाऱ्यांची दोन रिव्हॉल्व्हरही ठेवण्यात आली होती. Two revolvers stolen from the officer protecting CM Mamta, the Bengal Police lost their senses


    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीएम ममता बॅनर्जी यांचे संरक्षण करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबतच चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे रिव्हॉल्व्हरच चोरले. रिपोर्टनुसार, फक्त रिव्हॉल्व्हरच नाही तर मोबाईल फोन आणि बॅगेत असलेले काही पैसेही गायब आहेत. ही घटना कूचबिहारमधील आहे. बुधवारी आसाममधून ट्रेनमधून परतणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची बॅग बेपत्ता झाली. या बॅगेत सुरक्षा कर्मचाऱ्यांची दोन रिव्हॉल्व्हरही ठेवण्यात आली होती.

    आता सीएम ममता बॅनर्जी विमानाने गुवाहाटीला जात असल्याची माहिती मिळाली आहे. आता त्यांच्यासोबत फक्त दोन सुरक्षा कर्मचारी फ्लाइटमध्ये जाऊ शकत असल्याने उर्वरित 12 सुरक्षा कर्मचारी आधीच गुवाहाटीमध्ये पोहोचले होते, जिथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पूजा करण्यासाठी आणि मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. हे 12 सुरक्षा कर्मचारी ट्रेनने कोलकात्याला परत येत होते. काल सकाळी कूचबिहार स्टेशनवर त्यांना एक बॅग हरवल्याचे समजले. पश्चिम बंगाल पोलिस आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने बॅग शोधण्याचे काम सुरू झाले आहे. याप्रकरणी प्रशासन पूर्णपणे मौन बाळगून असून अधिकृतपणे काहीही बोलले जात नाही.



    सीएम ममता बॅनर्जी यांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांसोबत चोरीची घटना घडली असल्याने अशा परिस्थितीत पोलिसही त्या चोरलेल्या रिव्हॉल्व्हरचा लवकरच शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपींना वेळीच पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

    यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या रॅलीतही चोरीचे प्रकरण समोर आले होते. तेथे रॅलीत चन्नी यांना ऐकण्यासाठी आलेल्या दोघांचे मोबाईल चोरीला गेले. फोन चोरीबरोबरच 50 हजार रुपयांची ऑनलाइन शॉपिंगही करण्यात आली. अद्याप याप्रकरणीही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

    Two revolvers stolen from the officer protecting CM Mamta, the Bengal Police lost their senses

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र