विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला भारतीय लष्कराची गोपनीय माहिती देणाऱ्या हस्तकासह दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. यात लष्करी सेवेतील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हबीबुर रेहमान (वय ४१) आणि परमजित सिंह असे दोन आरोपीची नावे असून त्यांची चौकशी सुरू आहे. Two peoples arrest for giving information
हबीबुर रेहमान हा कंत्राटदार असून तो पोखरण येथे लष्करी छावण्यांना भाजीपाला पुरवठा करण्याचे काम करायचा. राजस्थानच्या पोखरण येथे हबीबुर रेहमान याच्या घरी दिल्ली पोलिसांनी छापा घातला असता तेथे लष्करासंबंधीचे संवेदनशील कागदपत्रे आढळून आली. परमजित सिंह हा सध्या आग्रा येथील छावणीत लिपिक म्हणून काम करत आहे.
तत्पूर्वी तो पोखरण येथील लष्करी कार्यालयात काम करायचा. तेथे हबीबुर रेहमानशी संपर्क आल्यानंतर त्यांची मैत्री वाढली. रेहमानने त्याला लष्कराचे गोपनीय कागदपत्रे देण्याची मागणी केली आणि त्या बदल्यात हवालामार्गे पैसा दिला जाईल, असे सांगितले.
नायक लिपिक परमजित याने हबीबुर रेहमानला लष्करासंबंधीची गोपनीय माहिती, प्रशिक्षणाशी निगडित माहिती, गुप्त ठिकाणांचे नकाशे, गुप्त कागदपत्रे उपलब्ध करून दिली होती. ही माहिती हबीबुर रेहमान हा पाकिस्तानात असलेल्या आपल्या म्होरक्यांना व्हॉटसअपद्वारे पाठवत होता.
परमजित सिंहला आतापर्यंत पाकिस्तानकडून सुमारे ९ लाख रुपये मिळाले आहेत. या नेटवर्कमध्ये आणखी काही जण सामील असू शकतात, असा पोलिसांना संशय आहे.
Two peoples arrest for giving information
महत्त्वाच्या बातम्या
- कोविडचा धोका;पंतप्रधानांची सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा; उध्दव ठाकरेही सहभागी होणार
- भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार – मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
- ITI साठी प्रवेशप्रक्रिया सुरू : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध, नवाब मलिक यांची माहिती
- West Bengal Violence : NHRC ने रिपोर्टमध्ये म्हटले- रेप आणि हत्येच्या प्रकरणांची CBI चौकशी व्हावी, राज्याच्या बाहेर चालावेत खटले
- कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे उत्तम काम, वडिलांप्रमाणे भूमिका निभावली; पवारांकडून कौतूक; दादा भुसेंची माहिती