• Download App
    लष्कर- ए-तोयबाच्या म्होरक्याला कंठस्नान ; बारामुल्लात सैन्य- दहशतवाद्यांमध्ये चकमक Two more terrorists killed, taking the death toll to 3. Search underway

    लष्कर- ए-तोयबाच्या म्होरक्याला कंठस्नान ; बारामुल्लात सैन्य- दहशतवाद्यांमध्ये चकमक

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय सैन्यांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रविवारी रात्री उडालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले.Two more terrorists killed, taking the death toll to 3. Search underway

    उत्तर काश्मीरच्या सोपोरच्या गुंड ब्रथ भागात रविवारी उशीरा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. भारतीय लष्करानं या संपूर्ण परिसराला वेढा घातला. त्यानंतर सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली. गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.

    आयपीजी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितलं, लष्करचा म्होरक्या मुदासिर पंडित हा या चकमकीत ठार झाला . पंडित याने 3 पोलिस, दोन नगरसेवक आणि २ नागरिकांची हत्या केली. एकूण लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. मुदासिर याच्या नावावर १० लाख रुपयांचे बक्षिस होते.

    नार्को टेरर मॉड्यूलचा पदार्फाश

    जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी बारामुल्ला येथे नार्को टेरर मॉड्यूलचा पदार्फाश केला. १२ जणांना अटक केली. ११ पॅकेट हेरॉईन, शस्त्रे आणि काडतुसे तसेच रोकड जप्त केली. आरोपींकडून १० ग्रेनेड, चार पिस्तूल आणि मोठ्या संख्येने काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्याशिवाय ११ पॅकेट हेरॉईनचे, २१.५ लाख रुपये रोख आणि एक लाख रुपयांचा चेकही जप्त केला आहे.

    Two more terrorists killed, taking the death toll to 3. Search underway

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Air Force Chief AP Singh : वायुसेना प्रमुख म्हणाले- आधुनिक युद्धात हवाई शक्ती निर्णायक; मजबूत लष्करी शक्ती बनण्यासाठी यावर फोकस गरजेचा

    West Bengal Voter List : पश्चिम बंगालची अंतिम मतदार यादीची तारीख बदलू शकते, आयोगाने म्हटले- 14 फेब्रुवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार काम पूर्ण होणे कठीण

    Karnataka Governor : कर्नाटक राज्यपालांचा संयुक्त अधिवेशन संबोधित करण्यास नकार; मंत्र्यांनी भेट घेतली