अनेकजण अद्यापही ढिगाऱ्याखाली दबलेले, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात तीन मजली इमारत कोसळल्याची बातमी आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यात अजूनही अनेक लोक अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक (एसडीआरएफ) बचाव कार्य करत आहेत. बाराबंकीचे एसपी दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, पहाटे ३ वाजता बाराबंकीत एक इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. Two killed many injured after three storey building collapses in Uttar Pradesh Barabanki
इमारतीच्या ढिगाऱ्यातून 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यात अजूनही तीन ते चार लोक गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. एसडीआरएफची टीम घटनास्थळी हजर असून बचावकार्य सुरू आहे. लवकरच एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. 12 जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत माहिती देताना बाराबंकी एसपी दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, रात्री 3.10 च्या सुमारास ही इमारत अचानक कोसळल्याची माहिती मिळाली. आणि सुमारे 19 लोक त्यात अडकले आहेत. स्थानिक लोक आणि अग्निशमन दलाच्या टीमने मिळून 12 जणांना बाहेर काढले आहे. ते म्हणाले की या कुटुंबातील चार लोक आधीच लखनऊला गेले होते, ते आधीच रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाला भेटायला गेले होते. घटनेच्या वेळी इमारतीमध्ये एकूण 16 जण झोपलेले होते.
Two killed many injured after three storey building collapses in Uttar Pradesh Barabanki
महत्वाच्या बातम्या
- “तो” परत आला; विदर्भात बरसला!!; विदर्भ, मराठवाड्यात यलो अलर्ट!!
- भाजपाकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित, उत्तर प्रदेशातून ‘या’ दिग्गज नेत्याला दिली उमेदवारी!
- ”सत्तेसाठी ‘INDIA’ आघाडी सनातन धर्म नष्ट करू पाहत आहे” अमित शाहांचा घणाघात!
- सनातन धर्माला मलेरिया, डेंगीचे लांछन लावणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनचा “ताप” तहसीन पूनावालांनी उतरवला!!