विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर – कटकमध्ये महानदीत मुंडली बंधाऱ्याजवळ भटकलेल्या हत्तीची सुटका करताना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची नौका बुडून बचावकार्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या दोन पत्रकारांना जलसमाधी मिळाली.Two journalist drowned
लोकांना घटनेचे प्रत्यक्ष चित्रीकरण दाखविण्याच्या प्रयत्नान या पत्रकारांना जीव गमवावा लागला. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ही नौका उलटली. या नौकेतून एका स्थानिक वृत्तवाहिनीचे बातमीदार अरिंदम दास व व्हिडिओ पत्रकार प्रभात सिन्हा बचावकार्याचे थेट प्रक्षेपण करत होते.
त्यांना गंभीर अवस्थेत एससीबी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले.
Two journalist drowned
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम केअर्स फंड हा सरकारी निधी नाही, केंद्राचे न्यायालयात शपथपत्र
- न्यायाधीश आनंद यांना हत्येसाठी जाणीवपूर्वक धडक : सीबीआयची न्यायालयात माहिती
- पुण्यातील निर्बंध ऑक्टोबरपासून शिथिल; पालकमंत्री अजित पवार यांचे कोरोना आढावा घेतल्यावर संकेत
- सबका साथ, सबका विकास, आत्मनिर्भरता, स्टार्ट अप्स, स्किल डेव्हलपमेंट संकल्पनांची मूळे दीनदयाळजींच्या “सबको काम” अर्थनीती मध्ये!