ISI चे 2 हेर पकडले; यूपीतील तरुणाच्या खात्यात 70 लाख, दुसऱ्याने पाकला लष्कराच्या टँकचे फोटो पाठवले
वृत्तसंस्था
प्रयागराज : यूपी ATS ने पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचाही आरोप आहे. अमृत गिल ऊर्फ अमृतपाल सिंग, रहिवासी रामपूर आणि रियाजुद्दीन, रहिवासी फरिदनगर, गाझियाबाद अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तर लखनऊच्या एटीएस पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Two ISI spies nabbed 70 lakhs in UP youth’s account, another sent photos of army tanks to Pakistan
एका महिन्यात रियाजुद्दीनच्या बँक खात्यात 70 लाख रुपये
एटीएसने सांगितले की, याआधी रियाझुद्दीन, इझारुल आणि इतर तीन आयएसआय एजंटविरुद्ध तपास सुरू करण्यात आला होता. मार्च 2022 ते एप्रिल 2022 या कालावधीत रियाजुद्दीनच्या बँक खात्यात सुमारे 70 लाख रुपये आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर ऑटोचालक अमृत गिलच्या खात्यातही पैसे आले.
अमृत गिलने भारतीय लष्कराच्या रणगाड्यांबाबतची माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा दावा एटीएसने केला आहे. इझारुल नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून रियाजुद्दीन आयएसआयच्या संपर्कात आला. राजस्थानमध्ये वेल्डिंगचे काम करत असताना दोघांची भेट झाली. तेव्हापासून दोघेही आयएसआयसाठी काम करत होते.
अमृत गिल हा पाकिस्तानी ISI एजंटच्या संपर्कात
मूळचा भटिंडाचा रहिवासी असलेला अमृत गिल हा आयएसआय एजंट्सच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या चौकशीत समोर आले आहे. तो भारतीय लष्कराशी संबंधित माहिती शेअर करत असे. या कामाच्या मोबदल्यात रियाजुद्दीन आणि इझारुल यांच्या मदतीने अमृत गिल यांना वेळोवेळी पैसे पुरवण्यात आले. इझारुल यापूर्वीच बिहारच्या बेतिया तुरुंगात बंद आहे.
रियाजुद्दीनचे पिलखुवा येथे वेल्डिंगचे काम
आयएसआयने गाझियाबाद येथून अटक केलेला रियाजुद्दीन हापूर जिल्ह्यातील पिलखुवा शहरात वेल्डिंगचे काम करतो. तर त्याचे वडील अन्वर हे काम आपल्या मूळ गावातच काम करतात. कॅनरा बँकेत रियाजुद्दीनचे खाते उघडले आहे. या खात्यातून 70 लाख रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाला, त्यानंतर तो तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आला.
Two ISI spies nabbed 70 lakhs in UP youth’s account, another sent photos of army tanks to Pakistan
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी म्हणाले- MP, CG, राजस्थानात इंडिया आघाडी संपणार, काँग्रेस-BRS एकमेकांची कार्बन कॉपी
- भारतीय पर्यटकांसाठी मलेशियात व्हिसामुक्त प्रवेश; 1 डिसेंबरपासून सुरू होईल सुविधा
- फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेती योजनांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग समवेत सांमजस्य करार!!
- आली आली पुन्हा आली, ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची बातमी पुन्हा आली!!; पण दौरा होणार की नाही, माहिती नाही!!