• Download App
    कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोप प्रकरणी ब्रिजभूषण सिंह विरोधात दोन FIR दाखल!Two FIRs filed against Brijbhushan Singh in the case of sexual harassment of wrestlers

    कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोप प्रकरणी ब्रिजभूषण सिंह विरोधात दोन FIR दाखल!

    दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर नोंदवला.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले आहेत. Two FIRs filed against Brijbhushan Singh in the case of sexual harassment of wrestlers

    बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर केलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर,  अमित शाह यांच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोन तासांनी एफआयआर नोंदवला.

    एक एफआयआर अल्पवयीन मुलीने केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर आहे. दुसरी एफआयआर इतर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांशी संबंधित आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा सक्रियपणे पाठपुरावा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

    बृजभूषण शरण सिंह यांनी लैंगिक छळाच्या आरोपांवरून पोलिसांत गुन्हा नोंदवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले. दिल्लीच्या जंतर-मंतरवर धरणे धरण्याआधी पैलवानांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीच्या अहवालाची वाट पाहिली पाहिजे होती, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

    ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, “न्यायपालिकेच्या निर्णयामुळे मी आनंदी आहे. दिल्ली पोलीस आरोपांची चौकशी करतील आणि मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. या देशात न्यायव्यवस्थेपेक्षा कोणीही मोठा नाही. सरकारनेही म्हटले होते की एफआयआर नोंदवण्यास हरकत नाही. मी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा नाही. मी आदेशाचे स्वागत करतो.’’

    Two FIRs filed against Brijbhushan Singh in the case of sexual harassment of wrestlers

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!