• Download App
    मध्यप्रदेशातील दोन शहरे पवित्र , दारू- मांस विक्रीवर बंदी, मुख्यंमत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा|Two cities in Madhya Pradesh sacred, ban on sale of liquor and meat, announcement by Chief Minister Shivraj Singh Chouhan

    मध्यप्रदेशातील दोन शहरे पवित्र , दारू- मांस विक्रीवर बंदी, मुख्यंमत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    भोपाल : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जैन तीर्थक्षेत्र कुंडलपूर आणि बंदूकरपूर ही दोन शहरे ‘पवित्र क्षेत्र’ म्हणून घोषित केली आहेत. या दोन्ही शहरांमध्ये मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.Two cities in Madhya Pradesh sacred, ban on sale of liquor and meat, announcement by Chief Minister Shivraj Singh Chouhan

    मद्य आणि मांस विक्रीवर पूर्ण बंदी असणारी ही दोन शहरे मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यात आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून २८५ किमी अंतरावर असलेल्या दामोह जिल्ह्यात असलेल्या कुंडलपूरमध्ये जैन समाजाच्या पंचकल्याणक उत्सवात सहभागी होताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केली.



    चौहान यावेळी म्हणाले की, विद्यासागर महाराज यांच्या इच्छेनुसार राज्य सरकार आगामी एका वर्षात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम (एमबीबीएस) हिंदीमध्ये सुरू करणार आहे. आचार्य विद्यासागर महाराज यांच्या प्रेरणेने ‘कुंडलपूर’ आणि ‘बंदकपूर’ ही दोन शहरे ‘पवित्र क्षेत्र’ म्हणून घोषित करत आहे. या शहरांमध्ये ‘मांस आणि दारूवर पूर्ण बंदी असेल.

    Two cities in Madhya Pradesh sacred, ban on sale of liquor and meat, announcement by Chief Minister Shivraj Singh Chouhan

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती