• Download App
    आसाममध्ये दोन प्रवासी बोटी एकमेकांना धडकल्या, ८४ प्रवाशांचा वाचविण्यात यश । Two boats trashed in Asaam

    आसाममध्ये दोन प्रवासी बोटी एकमेकांना धडकल्या, ८४ प्रवाशांचा वाचविण्यात यश

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडून झालेल्या दुर्घटनेतील ८७ पैकी ८४ जणांचा बचाव करण्यात यश आले आहे. दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. आसाममधील जोरहाट जिल्ह्यात निमती घाटाजवळ हा अपघात सायंकाळी घडला. Two boats trashed in Asaam

    ‘माँ कमला’ ही खासगी बोट माजुली येथे जात होती. त्याचवेळी माजुलीहून येणाऱ्या ‘त्रिपकाई’ या सरकारी फेरीबोटीशी तिची निमती घाट येथे धडक बसली. धडकेनंतर ‘माँ कमला’ बोट पाण्यात उलटून बुडाली. बोटीवर १२० हून अधिक लोक होते.



    शोधमोहिमेदरम्यान एका महिलेचा मृतदेह सापडला. ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर उलटलेल्या बोटीचे अवशेष एनडीआरएफच्या पाणबुड्यांना सापडले.

    या बोटीचा तळ कापला गेलेला होता. पण बोटीत एकही प्रवासी आढळला नाही. जोरहाट आणि माजुली जिल्ह्यांमधील वेगवेवगळ्याप गावांतील रहिवासी असलेल्या ८४ जणांचा बचाव करण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्वव सरमा यांनी आज घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला.

    Two boats trashed in Asaam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य