• Download App
    अफवा, दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी ‘ट्विटर’ने उचलले नवे पाउल, वर लवकरच दिसणार नवी रचना असलेले लेबल । Twittwe takes new steps to avoid bad practises

    अफवा, दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी ‘ट्विटर’ने उचलले नवे पाउल, वर लवकरच दिसणार नवी रचना असलेले लेबल

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : ट्विटरचा वापर करणाऱ्यांना चुकीची माहिती देणाऱ्या किंवा दिशाभूल करणाऱ्या ट्विट्‌सवर इशारा देणारी नवी लेबल लवकरच दिसणार आहेत. चुकीच्या माहितीपासून सावध राहण्यासाठी ट्विटरकडून दिले जाणारे इशारे अधिक परिणामकारक आणि संभ्रम कमी करणारे ठरावेत, यासाठी त्यांची रचना बदलण्यात आली आहे. Twittwe takes new steps to avoid bad practises

    ‘ट्विटर’कडून तीन प्रकारच्या चुकीच्या माहितीबाबत लेबल प्रसिद्ध केले जाते. समाजाला हानी पोहोचविण्यासाठी फेरफार केलेले ऑडिओ किंवा व्हिडिओ संदेश, निवडणुक अथवा मतदानासंदर्भातील चुकीची माहिती आणि कोरोना संदर्भात चुकीचे किंवा दिशाभूल करणारे संदेश, असे हे तीन प्रकार आहेत. फेररचना केल्यानंतर आता या लेबलसाठी नारिंगी आणि लाल रंगांचाही वापर केला जाणार आहे. आधीचे लेबल हे ट्विटरप्रमाणेच रंगसंगती असलेल्या निळ्या रंगात होते. नजरेला चटकन दिसून येणारे रंगीत लेबल वापरल्याने तो इशारा वापरणाऱ्यांच्या संख्येत १७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आल्याचे ‘ट्विटर’ने सांगितले.



    अमेरिकेत गेल्या वर्षी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीआधी आणि नंतर निवडणुकीबाबतच्या चुकीच्या माहितीचा इशारा देण्यासाठी ट्विटर कंपनी वापरत असलेल्या लेबलपेक्षा नवी लेबल अधिक स्पष्ट आणि परिणामकारक आहेत, असे कंपनीचे म्हणणे आहे. नवीन प्रकारच्या लेबलचा युजरना उपयोग तर होणारच आहे, पण ट्विटरलाही त्याचा फायदा होणार आहे.

    Twittwe takes new steps to avoid bad practises

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र