प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींनी लंडनमध्ये दिलेल्या भारतात लोकशाही नसल्याच्या भाषणांवरून भारतातले राजकारण तापले असून राहुल गांधींनी माफी मागावी, अशी आक्रमक मोहीमच भाजपने सुरू केल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसने देखील भाजपवर प्रतिआक्रमण चालविले आहे. पण त्यासाठी त्यांनी सावरकरांच्या नावाचा आधार घेणे सुरू केले आहे. Twitter war between Congress and BJP over savarkar issue
काँग्रेसने राहुल गांधी माफी मागणार नाहीत, असे सांगत सावरकर समझा क्या… अशा कॅप्शन ने राहुल गांधींचा एक फोटो ट्विट केला आता यातला भाजपने देखील तितकेच तडाखेबंद प्रत्युत्तर दिले आहे. सावरकर म्हणजे तिखट हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे उद्गार असलेला व्हिडिओ केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट केला आहे.
राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी सोशल मीडिया आपला टीआरपी घसरल्यानंतर नेहमीच सावरकरांच्या तथाकथित माफीनाम्याचा आश्रय घेतला आहे. सावरकरांच्या या तथाकथित माफीनाम्यावर प्रख्यात इतिहासकारांनी अनेक स्पष्ट खुलासे करूनही राहुल गांधींनी त्याकडे हेतूतः दुर्लक्ष करत अनेकदा जुनीच टेप वाजवली आहे आणि राहुल गांधी ही टेप वाजवतात म्हणून काँग्रेसचे नेतेच मुद्दे रिपीट करत राहिले आहेत.
– अटलजींचे उद्गार
राहुल गांधींच्या लंडन मधल्या भाषणावरून भाजपने त्यांनी माफी मागावी म्हणून जी आक्रमक मोहीम चालवली. तिला काँग्रेसने सावरकर समझा क्या… असे म्हणून प्रत्युत्तर दिले, पण त्यावर कडी करत भाजपने देखील माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करून सावरकर म्हणजे नेमके काय हे काँग्रेसला सुनावले आहे. सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तितिक्षा, सावरकर म्हणजे तिलमिलाहट, सावरकर म्हणजे तळमळ, सावरकर म्हणजे तिखापन, सावरकर म्हणजे तिखट!!, अशा शब्दांमध्ये अटलजींनी त्यांचे वर्णन केले होते. त्यांच्या याच भाषणाचा व्हिडिओ शेअर करून भाजपने काँग्रेसला तिखट प्रत्युत्तर दिले आहे.
Twitter war between Congress and BJP over savarkar issue
महत्वाच्या बातम्या
- राहुलजींचा टीआरपी घसरलाय का??; सावरकर समझा क्या…, राहुल गांधींचा फोटो शेअर करत काँग्रेसने डिवचले!!
- सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले, पण उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी गद्दारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात
- महाविकास आघाडी टिकवण्यासाठी छगन भुजबळांची क्लुप्ती; म्हणाले, मला शरदराव ठाकरे आवडतात!!
- मशिदींची मुजोरी संपवा!!; राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर