• Download App
    शेतकरी आंदोलनात मोदी सरकारच्या धमक्या, ट्विटर सह संस्थापक जॅक डॉर्सीचा दावा; तर भारतीय कायदे तोडणाऱ्या जॅक डोर्सी खोटारडा; केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा जोरदार पलटवार|Twitter co-founder Jack Dorsey claims Modi government's threats in farmers' agitation

    शेतकरी आंदोलनात मोदी सरकारच्या धमक्या, ट्विटर सह संस्थापक जॅक डॉर्सीचा दावा; तर भारतीय कायदे तोडणाऱ्या जॅक डोर्सी खोटारडा; केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा जोरदार पलटवार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रातील मोदी 2022 मध्ये शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी ट्विटर सारख्या सोशल मीडियावर दबाव आणला होता. सरकार सातत्याने ट्विटरला धमक्या देत होते, असा दावा ट्विटरचा सह संस्थापक जॅक डोर्सी यांनी केला आहे. मात्र हा दावा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पूर्णपणे फेटाळला असून ट्विटरचा काळा इतिहास झाकण्यासाठीच जॅक डोर्सी हा दावा करत असल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे.Twitter co-founder Jack Dorsey claims Modi government’s threats in farmers’ agitation



    भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आम्ही गदा आणलेली नाही. उलट जॅक डोर्सी ट्विटर सीईओ असताना त्यांनी भारताचे सार्वभौमत्व मान्य केले नव्हते. भारतीय कायद्यांचे त्यांनी वारंवार उल्लंघन केले. याचे अनेक उदाहरणे सरकारकडे पुराव्यांसह उपलब्ध आहेत. भारतीय कायद्यांपेक्षा ट्विटर कंपनी स्वतःला वरच्या दर्जाची समजत होती.

    शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विटरने अनेक फेक न्युज पसरवल्या. भारतात नरसंहार होत असल्याच्या खोट्या बातम्या व्हायरल केल्या. ट्विटरचा हा काळा इतिहास विसरता येणार नाही. पण त्याच्यावरच रंग सफेदी करण्यासाठी आता जॅक डॉर्सी मोदी सरकारने धमक्या दिल्याच्या अफवा पसरवतो आहे, अशा परखड शब्दांमध्ये राजीव चंद्रशेखर यांनी समाचार घेतला आहे.

    Twitter co-founder Jack Dorsey claims Modi government’s threats in farmers’ agitation

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका