• Download App
    ट्विटर ताळ्यावर, नियमांचे पालन करण्यासाठी उचलणार पावले|Twitter applause, steps to follow to follow the rules

    ट्विटर ताळ्यावर, नियमांचे पालन करण्यासाठी उचलणार पावले

    भारत सरकारने अल्टीमेटम दिल्यावर ट्विटर ताळ्यावर आले आहे. डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली जात आहेत, असे ट्विटरने सरकारला सांगितले. याबाबत एका आठवड्यात नवीन डिजिटल नियमांचे पालन करण्याबाबत झालेल्या प्रगतीचा तपशील सरकारला सादर करु, असे ट्विटरने स्पष्ट केले.Twitter applause, steps to follow to follow the rules


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत सरकारने अल्टीमेटम दिल्यावर ट्विटर ताळ्यावर आले आहे. डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली जात आहेत, असे ट्विटरने सरकारला सांगितले.

    याबाबत एका आठवड्यात नवीन डिजिटल नियमांचे पालन करण्याबाबत झालेल्या प्रगतीचा तपशील सरकारला सादर करु, असे ट्विटरने स्पष्ट केले.उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटविल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता,



    अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला होता. फेसबुक, गुगल यासह अनेक कंपन्यांनी डिजिटल नियमांनुसार तक्रार अधिकाºयांची नेमणूक करण्यासारखी अनेक पावले उचलली आहेत. परंतु ट्विटर आणि सरकारमधील संघर्ष कमी होताना दिसत नव्हता.

    ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांची कंपनी भारतातील सेवांबद्दल वचनबद्ध आहे आणि एक महत्त्वपूर्ण जनसंवाद मंच म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. मार्गदर्शक तत्त्वाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन सरकारला देण्यात आले आहे.

    आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा तपशील सरकारला सांगण्यात आला आहे. आम्ही भारत सरकारशी संवाद सुरु ठेवू तसेच एका आठवड्या कंपनी सरकारला नवीन निर्णयांचा अहवाल सादर करु, असे कंपनीने म्हटले आहे.

    गेल्या दीड वर्षात भारत सरकार व ट्विटर यांच्यात अनेक विषयांवर तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. ट्विटर टूल किटचा मुद्दा सर्वप्रथम शेतकरी चळवळीच्या वेळी समोर आला. त्यानंतर कॉंग्रेसच्या कथित टूलकिट संदर्भात भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटर देखील गंभीर आरोप केले होते.

    Twitter applause, steps to follow to follow the rules

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशची इंटरपोलकडे हसीनांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसची मागणी; 9 महिन्यांपासून भारतात आहेत माजी पंतप्रधान

    दिल्ली महापौर निवडणुकीतून आम आदमी पार्टीची माघार; पराभवाच्या खात्रीने सुचला राजकीय विचार!!

    Kulbhushan Jadhav : कुलभूषण पाकिस्तानातील हायकोर्टात करू शकणार नाहीत अपील; फक्त कॉन्सुलर सहाय्य प्रदान केले