वृत्तसंस्था
कोलकता – प्रसिद्ध दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता (वय ७७) यांचे आज त्यांच्या राहत्या घरी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बराच काळापासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते. Twelve National Award winning director Buddhadev Dasgupta passed away
१९७८ मध्ये ‘दुरत्व’ हा पहिला चित्रपट बनविणाऱ्या बुद्धदेव दासगुप्ता यांना त्यांच्या कारकिर्दीत १२ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. कवी, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी बंगाली चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवला.
‘नीम अन्नपूर्णा’,‘गृहयुद्ध’, ‘बाघ बहादूर’, ‘ चाराचार’, ‘लाल दर्जा’, ‘उत्तरा’, ‘स्वप्नेर दिन’, ‘कालपुरुष’ असे त्यांचे चित्रपट चांगले गाजले. ‘अंधी गली’ आणि ‘अन्वर का अजब किस्सा’ या हिंदी चित्रपटांचेही त्यांनी दिग्दर्शन केले होते.
बुद्धदेव दासगुप्ता यांचा १९४४ मध्ये पारुलिया येथे झाला होता. एका महाविद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. नंतर चित्रपट क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी ७० च्या दशकात कलकत्ता फिल्म सोसायटीत आपले नाव नोंदविले.
Twelve National Award winning director Buddhadev Dasgupta passed away
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांना काम की बात करण्याचा सल्ला पण राज्यात नीट लसीकरण जमेना, झारखंडमध्ये तब्बल ३४ टक्के कोरोना प्रतिबंधक लसी गेल्या वाया
- मानवी जीवनाला गती देणाऱ्या चारचाकी मोटारींचा अनोखा प्रवास
- अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांना होतो बराच त्रास, अवमानास्पद वागणुकीत वाढ
- अभिनेता सुशांतसिंहच्या जीवनावरील चित्रपट रिलीज होणारच, तीन सिनेमे येणार
- इंग्लंडमध्येही घरांच्या किंंमती कवडीमोल, दोन खोल्यांचे घर केवळ १०३ रुपयांत