• Download App
    Tushar Goel दिल्लीतल्या 2000 कोटींच्या ड्रग्स रॅकेटचा मास्टर माईंड तर निघाला काँग्रेसचा नेता तुषार गोयल!!

    Tushar Goel : दिल्लीतल्या 2000 कोटींच्या ड्रग्स रॅकेटचा मास्टर माईंड तर निघाला काँग्रेसचा नेता तुषार गोयल!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट सिंडिकेटचा पर्दाफाश केला. दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथून पोलिसांनी 560 किलो कोकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 2000 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 तस्करांना अटक केली आहे. यातील हाशिमी मोहम्मद वारिस आणि अब्दुल नायब या दोन आरोपींकडून 400 ग्रॅम हेरॉईन आणि 160 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. Tushar Goel mastarmind delhi drugs

    पण या सगळ्यांचा मास्टर माईंड तर तुषार गोयल नावाचा काँग्रेसचा नेता निघाला. तुषार गोयल हा 2022 मध्ये दिल्ली काँग्रेसच्या आरटीआयटी सेलचा प्रमुख होता. त्याने काँग्रेससाठी अनेक सोशल मीडिया कॅम्पेन चालवली होती. त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर बड्या बड्या काँग्रेस नेत्यांचे त्याच्या सोबत फोटो असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले. 2002 मध्ये तुषार गोयल युवक काँग्रेसचा सदस्य बनला. त्यानंतर त्याने काँग्रेससाठी विविध प्रकारचे कामे केली. 2022 मध्ये काँग्रेसच्या आरटीआय सेलचा तो प्रमुख बनला. ही माहिती त्यानेच पोलीस तपासात दिली.

    दिल्लीतील कोकेन जप्तीची ही सर्वांत मोठी घटना मानली जात आहे. या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिस गेल्या दोन महिन्यांपासून काम करत होते. त्यानंतर पोलिसांना ड्रग्ज पुरवठ्याबाबत माहिती मिळाली. हे तस्कर राजधानी आणि एनसीआरमध्ये या अंमली पदार्थाची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कोकेनची किंमत 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


    PM Modi : पंतप्रधान मोदींचे नीरज चोप्राच्या आईला पत्र; चुरमा पाठवल्याबद्दल आभार, ते खाऊन भावुक झालो!


    तुषार गोयल असे एका आरोपीचे नाव आहे. तो दिल्लीतील वसंत विहार येथील रहिवासी आहे. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र हिमांशू आणि औरंगजेबही होते. तिन्ही आरोपींना कुर्ला पश्चिम येथून रिसीव्हर भरत जैनसह पकडण्यात आले.

    तुषार, हिमांशू आणि औरंगजेब यांच्याकडून सुमारे 15 किलो कोकेन जप्त करण्यात आले. महिपालपूर एक्स्टेंशन येथील गोदामातून रिसीव्हरला पुरवठा करण्यासाठी बाहेर पडत असताना त्याला पकडण्यात आले. कुशवाह म्हणाले की, गोदामाच्या तिसऱ्या मजल्यावरून एका बॉक्समध्ये पोलिसांना 23 पोलो शर्टमध्ये कोकेन आणि मेरवाना सापडले.

    30 सप्टेंबर रोजी 228 किलो गांजा जप्त :

    गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली पोलिस ड्रग्ज पुरवठादारांना पकडण्यासाठी ऑपरेशन ‘कवच’ राबवत आहेत. दिल्ली गुन्हे शाखेने 30 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलचा पर्दाफाश केला होता, ज्यामध्ये 228 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 1.14 कोटी रुपये होती. या कार्टेलच्या दोन पुरवठादारांनाही अटक करण्यात आली.

    27 जुलै रोजी 6 किलो कोकेन जप्त :

    दिल्ली पोलिसांनी 27 जुलै रोजी दिल्ली विमानतळावर एका जर्मन नागरिकाला 6 किलो ग्रेड-ए कोकेनसह पकडले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत 12 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशोक कुमार असे आरोपीचे नाव आहे.

    Tushar Goel mastarmind delhi drugs

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!