• Download App
    Tulsi Gabbard meets PM Modi टेरिफ बद्दल ट्रम्प + मोदी यांच्यात थेट उच्चस्तरीय चर्चा; अमेरिका - भारत मध्यम मार्गी तोडगा काढण्याची आशा!!

    USA NSA Tulsi Gabbard : टेरिफ बद्दल ट्रम्प + मोदी यांच्यात थेट उच्चस्तरीय चर्चा; अमेरिका – भारत मध्यम मार्गी तोडगा काढण्याची आशा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन सत्तारूढ झाल्यानंतर ट्रम्प यांनी जी अनेक कठोर पावले उचलली, त्यामध्ये भारत, चीन आणि युरोप यांच्यासारख्या देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर दुपटीने टेरिफ लावायची घोषणा केली. त्यामुळे सर्वच देशांना आर्थिक धोका निर्माण झाला. युरोप मधल्या देशांनी ट्रम्प प्रशासनाचा निषेध केला. चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर दाम दुपटीने टेरिफ लावण्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात या गोष्टी अद्याप अंमलात आलेल्या नाहीत. Tulsi Gabbard meets PM Modi

    या पार्श्वभूमीवर भारतातील मोदी सरकारने ट्रम्प प्रशासनाच्या टेरीफ बद्दलच्या निर्णयावर कुठलीही घाई गर्दीत प्रतिक्रिया व्यक्त केली नाही त्याचे रहस्य अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तुलसी गबार्ड यांच्या मुलाखतीतून समोर आले. टेरिफ या विषयावर डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये थेट उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. दोन्ही देशातले अतिवरिष्ठ अधिकारी त्या चर्चेमध्ये सहभागी झालेत. दोन्ही देशांमध्ये प्रायव्हेट सेक्टर वेगवेगळी इनपुट देत आहेत‌. त्यातून टेरिफ या विषयावर मध्यम मार्गी उपायोजना निघेल, असा आत्मविश्वास तुलसी गबार्ड यांनी व्यक्त केला.

    भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधल्या प्रायव्हेट सेक्टरला व्यापार वाढवण्यामध्ये जास्त रस आहे. ट्रम्प आणि मोदी यांच्यातले संबंध देखील अत्यंत मैत्रीचे आणि गाढ आहेत. दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि अर्थ या क्षेत्रांमध्ये संबंध वाढणार आहेत या पार्श्वभूमीवर टेरिफ या विषयावर दोन्ही देश सामंजस्यानेच तोडगा काढतील. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी तो सकारात्मक असेल, असे तुलसी गबार्ड म्हणाल्या.

    गंगा जल + तुलसी माला भेट

    तुलसी गबार्ड यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली. यावेळी मोदींनी त्यांना प्रयागराजच्या त्रिवेणी संगमातले गंगाजल भेट दिले, तर तुलसी गबार्ड यांनी पंतप्रधान मोदींना तुलसी माला भेट दिली.

     

    Tulsi Gabbard meets PM Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Himanta Biswa Sarma : हिंदू-मुस्लिम जमीन खरेदी-विक्रीची स्पेशल ब्रँचकडून कसून चौकशी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा निर्णय

    Mohan Bhagwat संघाला विरोध कमी होण्यामागे प्रेमाची शक्ती, मोहन भागवत यांचे प्रतिपादन

    BJP States : भाजपशासित राज्यांनी म्हटले- न्यायालय विधेयकांना मान्यता देऊ शकत नाही, हा फक्त राज्यपाल किंवा राष्ट्रपतींचा अधिकार