विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Trump-Zelensky सर्वसाधारणपणे राजनैतिक संबंधांमध्ये घडत नाही अशी तुफान खडाजंगी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये झाली. त्यामुळे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स देखील सामील झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पडसाद उमटले. जगभरातल्या राजनैतिक वर्तुळामध्ये तो खळबळजनक चर्चेचा विषय ठरला.Trump-Zelensky
युद्धमान असलेल्या दोन देशांमध्ये कितीही तणावाचे संबंध असले तरी वाटाघाटींच्या टेबलवर सर्वसाधारणपणे दोन्ही देशांमधले मुत्सद्दी आंतरराष्ट्रीय संकेत पाळूनच सभ्य भाषेमध्ये वादसंवाद करतात. त्यांच्यातही अनेकदा खटके उडतात, पण ते बाहेर येत नाहीत. संतप्त चेहऱ्यांवर हासरे मुखवटे घालूनच ते बाहेर येतात. ट्रम्प आणि झेलेन्सकी यांच्यातल्या कालच्या व्हाईट हाऊस मधल्या चर्चेत विपरीतच घडले.
युक्रेन मधल्या खनिजे संपत्तीचे अधिकार अमेरिकेला देण्याच्या दृष्टीने करार करण्याच्या हेतूने झेलेन्स्की अमेरिकेत दाखल झाले. ते व्हाईट हाऊस मध्ये गेले. तिथे त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर वाटाघाटी केल्या. परंतु या वाटाघाटींमध्ये काही मुद्द्यांवर गंभीर मतभेद झाल्यानंतर त्याचे रूपांतर खटका उडण्यात झाले आणि त्यानंतर तर दोन्ही नेत्यांमध्ये तुफान खडाजंगी झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी खनिज संपत्ती करार मोडून टाकला. तुम्ही मूर्ख राष्ट्राध्यक्ष आहात तुम्हाला शांतता नको आहे. ज्यावेळी तुम्हाला शांततेची गरज वाटेल, त्यावेळी तुम्ही पुन्हा अमेरिकेकडेच या. किंबहुना तुम्हाला यावेच लागेल.
अमेरिकेने तुमच्यावर 350 अब्ज डॉलर्स खर्च केले. तुमची माणसे मरतायेत त्याकडे तुमचे लक्ष नाही. तुम्ही भलत्याच मुद्द्यावर अडेलतट्टूपणा करत आहात, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की सुनावले. झेलेन्स्की यांनी त्यांचा प्रतिवाद केला. त्यावेळी उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स मध्ये पडले. त्यांनी प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन झेलन्स्की यांना सुनावले. अमेरिकेने मदत केली नसती, तर तुम्ही दोन दिवस टिकला नसतात, असे जे. डी. व्हान्स म्हणाले. त्यावर युक्रेनला संपविण्याचा बाता रशियाने देखील मारल्या होत्या. पण अजून आम्ही त्यांच्या विरोधात लढतो आहोत, असे झेलेन्स्की ट्रम्प आणि व्हान्स यांना सुनावले.
अमेरिका आमचा मित्र आहे. युरोप आमचा मित्र आहे. पण पुतीन सत्तेवर असलेला रशिया आमचा शत्रूचा आहे आणि त्याच्याशी आम्ही लढणार. ही वस्तुस्थिती अमेरिकेने समजून घ्यावी, असे झेलेन्स्की यांनी फॉक्स न्यूजच्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांना सुनावले. झेलेन्स्की यांनी ओव्हल ऑफिसचा अपमान केल्याबद्दल “माफी” मागण्याची मागणी अमेरिकेने केली. त्यावर झेलेन्स्की यांनी फक्त “खेद” व्यक्त केला.
Trump-Zelensky Showdown in the Oval Office of the White House; US-Ukraine tensions!!
महत्वाच्या बातम्या
- Nagpur एच एस ह्युसंग कंपनीची नागपूरात १७४० कोटींची गुंतवणूक; ४०० युवकांना रोजगार!!
- Manipur : मणिपूरच्या सात जिल्ह्यांतील लोकांनी शस्त्रे, दारूगोळा अन् बंदुका सुरक्षा दलांना सोपवल्या
- मुंबईतील डिफेन्स क्लबमध्ये ७८ कोटींचा घोटाळा!
- Hazaribagh :महाशिवरात्रीला झारखंडमध्ये दोन गटांत हिंसाचार, दगडफेक व जाळपोळीत अनेक जखमी