• Download App
    PM Modi इराण - इजरायल संघर्षाचे कारण सांगून ट्रम्प G7 बैठक अर्ध्यावर सोडून कॅनडातून अमेरिकेत, पण मोदींची भेटही टाळली!!

    इराण – इजरायल संघर्षाचे कारण सांगून ट्रम्प G7 बैठक अर्ध्यावर सोडून कॅनडातून अमेरिकेत, पण मोदींची भेटही टाळली!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इराण – इजराइल संघर्षाचे कारण सांगून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 ही बैठक अर्ध्यावर टाकून कॅनडातून अमेरिकेत प्रस्थान ठेवले. पण त्याचवेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणेही टाळले. इजराइल इराणवर आणखी मोठे हल्ले करायच्या बेतात असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 ची बैठक अर्ध्यावर सोडली. कॅनडातून ते अमेरिकेत निघून गेले अत्यंत महत्त्वाच्या वेळी मी वॉशिंग्टन मध्ये असणे आवश्यक आहे, अशी पोस्ट त्यांनी केली. त्याचबरोबर इराणी नागरिकांनी लवकरात लवकर तेहरान सोडावे असे आवाहन करून अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याची सूचनाही दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेणे डोनाल्ड ट्रम्प यांनी टाळले. PM Modi

    इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लला अली खामेनी यांना संपविल्याशिवाय इजराइल इराण युद्ध थांबणार नाही असा इशारा इजराइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिल्यानंतर दोन्ही देशातल्या संघर्षाचे स्वरूप अधिक तीव्र बनले. इराणने अण्वस्त्रे बनविण्याचे काम ताबडतोब थांबवावे. त्यांनी शस्त्रसंधी करून घ्यावी. इराणचे आर्थिक आणि सुरक्षाविषयक नुकसान टाळावे, असे आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. त्याचवेळी अमेरिकेने इराणवर हल्ल्याची तयारी चालवली म्हणून ट्रम्प G7 ची बैठक अर्ध्यावर सोडून कॅनडातून अमेरिकेत गेले.



    वास्तविक इराणची राजधानी तेहरानमधून आधीच पलायन सुरू झाले आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आवाहनाची भर पडून तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर ट्रॅफिक जाम झाला आहे. पाकिस्तानने इराणची बॉर्डर सील केल्यामुळे इराणी नागरिकांचा ओघ पाकिस्तानकडे वळण्याऐवजी तुर्कस्तान कडे वळला आहे.

    डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा सोडून अमेरिकेत जाणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रसमधून कॅनडात येणे हे एकाच वेळी घडले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात आपण पुढाकार घेऊन शस्त्रसंधी घडवून आणली. दोघांनाही व्यापाराची लालूच दाखवली, असे डोनाल्ड ट्रम्प 13 वेळा म्हणाले. परंतु पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारने त्यांच्या वक्तव्याला एकदाही मान्यता दिली नाही. काँग्रेसने मात्र याबद्दल पंतप्रधान मोदींना अनेक वेळा जाब विचारला पण त्याचेही उत्तर पंतप्रधानांनी एकदाही दिले नाही.

    या पार्श्वभूमीवर G7 गटाच्या बैठकीच्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आमने – सामने असते. कदाचित दोघांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली असती. त्यामध्ये काही चर्चा होऊन खुलासे झाले असते. पण डोनाल्ड ट्रम्प कॅनडा सोडून अमेरिकेत गेल्याने ट्रम्प आणि नरेंद्र मोदी आमने – सामने येण्याची शक्यता संपुष्टात आली.

    Trump left Canada, PM Modi lands in Canada

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय- नवीन प्रभाग रचना, OBC आरक्षणासह होणार महापालिका निवडणुका, सर्व याचिका फेटाळल्या

    मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी निष्पाप हिंदूंना अडकवले, मुख्यमंत्री योगींची काँग्रेसवर टीका

    कम्युनिस्टांकडून गुन्हेगारांना लाल सलाम?’ भाजप खासदार सदानंदन मास्टर यांचे पाय कापणाऱ्यांना जेलमध्ये जाण्यापूर्वी जल्लोषात निरोप