• Download App
    भारतीय लष्कराला त्रिशूळ, वज्र हत्यारे; ड्रॅगनला अद्दल घडवणार; पौराणिक शस्त्रांचा आधार । 'Trishul' and 'Sapper Punch'- non-lethal weapons-developed by UP-based Apasteron Pvt Ltd to make the enemy temporarily ineffective in case of violent face offs

    भारतीय लष्कराला त्रिशूळ, वज्र हत्यारे; ड्रॅगनला अद्दल घडवणार; पौराणिक शस्त्रांचा आधार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कायम आहे. गेल्यावर्षीय लडाखमधील  गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने भारतीय जवानांवर काटेरी दांडे. टीझर गन आणि इतर हत्यारे घेऊन हल्ला केला होता. तेव्हा भारताच्या वीर जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला होता. हे तणावाचे वातावरण अद्याप कायम आहे. या घटनेनंतर भारताच्या संरक्षण दलांनी नोएडामधील एका कंपनीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याचा सामना करण्यासाठी वापरण्यास हलक्या आणि कमी प्राणघातक असलेली शस्त्रे तयार करण्यास सांगितले होते. ‘Trishul’ and ‘Sapper Punch’- non-lethal weapons-developed by UP-based Apasteron Pvt Ltd to make the enemy temporarily ineffective in case of violent face offs

    सुरक्षा दलांनी कंपनीला कमी प्राणघातक शस्त्रांची ऑर्डर दिली होती. दरम्यान, कंपनीने शिवशंकराच्या त्रिशुळापासून प्रेरणा घेत तसेच एक हत्यार विकसित केले आहे. एपेस्टेरॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मोहित कुमार यांनी एएनआयला सांगितले की, गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेनंतर संरक्षण दलांनी आम्हाला कमी प्राणघातक शस्त्रे विकसित करण्यास सांगितले होते. सध्या चिनी सैन्य अशी शस्त्रे बाळगते.

    आम्ही अशी टिझर गन आणि कमी प्राणघातक शस्त्रे बनवली आहेत. जी आमच्या पारंपरिक हत्यारांपासून प्रेरित झालेली आहेत. त्यामध्येच लोखंडाचे काटे असलेला दांडा तयार करण्यात आला आहे. त्याचे वज्र असे नामकरण करण्यात आले आहे. हे हत्यार विरोधी सैनिकांसोबतच्या चकमकीत उपयोगी ठरेल. तसेच याचा वापर करून बुलेटप्रुफ वाहनांना पंचरही करता येते. तसेच या वज्राची खासिय म्हणजे याच्या काट्यामधून विजेचे झटकेही देता येतात. त्यामुळे हातघाईच्या लढाईत प्रतिस्पर्धी सैनिकाला काही काळ बेशुद्ध करता येते.



    याशिवाय कंपनीकडून एक त्रिशूळ तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून शत्रूच्या वाहनांना आपल्या क्षेत्रात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी तसेच सैनिकांचा सामना करण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय खास प्रकारचे ग्लव्हज विकसित करण्यात आले आहेत. त्यांचे नाव सॅपर पंच आहे. हे ग्लव्हज हातात घालून समोरील व्यक्तीवर मारल्यास विजेचा धक्का बसतो. त्यामुळे समोरील व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. तसेच थंडीच्या दिवसांत यांचा हातमोजे म्हणूनही वापर होऊ शकतो.

    या हत्यारांच्या मारक क्षमतेबाबत मोहित कुमार यांनी सांगितले की, या हत्यारांमुळे कुणाचाही मृत्यू होणार नाही. तसेच कुणी गंभीररीत्या जखमीही होणार नाही. मात्र जेव्हा कधी हातघाईची झटापट होईल तेव्हा ही हत्यारे काही सेकंदात शत्रूला गारद करू शकतील. तसेच ही हत्यारे केवळ संरक्षण दले आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या एजन्सींनाच दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    ‘Trishul’ and ‘Sapper Punch’- non-lethal weapons-developed by UP-based Apasteron Pvt Ltd to make the enemy temporarily ineffective in case of violent face offs

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली