विशेष प्रतिनिधी
आगरतळा – त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी आता फ्रूट डिप्लोमसीचा अंगीकार करत राज्य फळ असणारे अननस बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाझेद यांना भेट म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. हसीना यांनी काही दिवसांपूर्वी देव यांना हरिभंगाचे स्पेशल आंबे भेट म्हणून पाठविले होते, आता विप्लवदेव हे त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून अननस पाठविणार आहेत. अननसाची एक मोठी करंडीच शेख हसीना पाठविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. Tripura CM will send pineapple to bangaladesh
बांगलादेश मुक्तिसंग्रामात १९७१ साली त्रिपुराने हजारो निर्वासितांना आश्रय दिला होता, तेव्हापासून बांगलादेशचे या राज्याशी ऋणानुबंध आहेत. रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा आदी माध्यमांतून बांगलादेश त्रिपुराशी असलेले संबंध बळकट करण्याचा प्रयत्न करतो. त्रिपुरातील गोमती जिल्ह्यात आम्पी ब्लॉक येथे मोठ्या प्रमाणावर अननसाचे उत्पादन घेतले जाते.
बांगलादेशचे सहाय्यक उच्चायुक्त मोहंमद जुबैद हुसैन यांनी सोमवारी देव यांना तीनशे किलो आंब्यांचे मेगा गिफ्ट दिले होते. बांगलादेशातील रंगपूर जिल्ह्यात हरिभंगा आंब्यांची लागवड करण्यात येते. जगभरात महागडे आंबे म्हणून ते ओळखले जातात. आता विप्लवकुमार देव हे साडेसहाशे किलो वजनाच्या अननसाच्या शंभर करंड्या ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालयात पाठविणार आहेत. हे अननस पुढे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात येतील, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.
Tripura CM will send pineapple to bangaladesh
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दक्ष; कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी स्वयंसेवकांना देशव्यापी प्रशिक्षण
- आमीर खानसारखेच लोक लोकसंख्या वाढविण्यास कारणीभूत, भाजपा खासदार सुधीर गुप्ता यांचा आरोप
- कोरोना महामारीमुळे भीषण परिस्थिती असूनही देशातील थेट करवसुलीचे प्रमाण ९१ टक्यांनी वाढले
- लडाखमधील शंभर टक्के जनतेल मिळाला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस
- किटेक्स ग्रुप केरळ सोडून गेल्याने शशी थरुर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, गुंतवणूक राज्यातून परत जाण्यासाठी कम्युनिस्ट सरकारचे सर्व प्रयत्न