पश्चिम बंगालमधील चार महापालिकांच्या निवडणुकीत टीएमसीने मोठा विजय मिळवला आहे. येथे 12 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, TMC विधाननगर महापालिकेत 41 पैकी 24 जागा जिंकल्या होत्या आणि 10 वर आघाडीवर होती. या पार्श्वभूमीवर येथेही टीएमसीचा विजय निश्चित झाला आहे, असे म्हणता येईल. Trinamool’s resounding victory in four municipal elections in West Bengal, says Mamata
वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमधील चार महापालिकांच्या निवडणुकीत टीएमसीने मोठा विजय मिळवला आहे. येथे 12 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, TMC विधाननगर महापालिकेत 41 पैकी 24 जागा जिंकल्या होत्या आणि 10 वर आघाडीवर होती. या पार्श्वभूमीवर येथेही टीएमसीचा विजय निश्चित झाला आहे, असे म्हणता येईल.
ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून म्हटले की, ‘पुन्हा एकदा विजय. हा माँ माटी मानुषचा विजय आहे. आसनसोल, विधाननगर, सिलीगुडी आणि चंदननगर येथील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करते. TMC वर विश्वास दाखवणाऱ्या सर्वांची मी आभारी आहे.
आसनसोलमध्ये टीएमसीने 43 जागा जिंकल्या आहेत
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आसनसोल महापालिकेत 43 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. आसनसोल महापालिकेत सीपीआयएमला दोन तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत.
TMC: 43 जागा
सीपीआयएम : 2 जागा
भाजप : ३ जागा
काँग्रेस : १ जागा
ममता यांची टीएमसी सर्वात पुढे, भाजप खूपच मागे
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सिलीगुडी, विधाननगर, चंदननगर आणि आसनसोल महापालिका निवडणुकीच्या निकालात आघाडी मिळवली आहे. तर भारतीय जनता पक्ष (भाजप) या सर्व महापालिकांमध्ये पिछाडीवर आहे.
सिलीगुडी (३५/४७)
टीएमसी-31, भाजप-2, LF-1, कॉंग्रेस-1
विधाननगर (४१/४१)
टीएमसी-39, काँग्रेस-1, इतर-1
चंदननगर (२०/३३)
टीएमसी-19, LF-1
आसनसोल (५५/१०६)
टीएमसी- 50, भाजप- 4, इतर-1
Trinamool’s resounding victory in four municipal elections in West Bengal, says Mamata
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गजवा-ए-हिन्द’ का स्वप्न पाहाणाऱ्यांचे स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही; योगी यांचे ट्विट
- बार्शीत खंडणीखोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या; अनेक दिवसांपासून उच्छाद
- रेल्वे तिकीट ऑनलाईन बूक करताना घ्या प्रवासी विमा, दुर्घटनेनंतर अनेक फायदे
- आसामच्या मुख्यमंत्र्यांचा राहूल गांधींवर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले राहूल गांधी आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना
- आसामच्या मुख्यमंत्र्यांना म्हणून आहे राहूल गांधींचा राग, कुत्र्याच्या प्लेटमधील बिस्किटे दिली होती खायला
- महाराष्ट्रातील वाघाची कॉँग्रेस- राष्ट्रवादीसोबत गेल्याने शेळी, भोपाळमध्ये मात्र व्हॅलेंटाईन डे विरोधात डरकाळ्या