वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशात तृणमूल काँग्रेस निवडणूक लढवणार नाही, तर समाजवादी पक्षाला संपूर्ण पाठिंबा देईल. येत्या 8 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उत्तर प्रदेश दौऱ्यावर येत आहेत. त्यांची समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद होईल, अशी माहिती समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष किरणमय नंदा यांनी दिली आहे.Trinamool supports Samajwadi in Uttar Pradesh; Mamata – Akhilesh Joint Press Conference on 8th February
एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कोणतेही राजकीय अस्तित्व नसताना हे दोन्ही प्रादेशिक पक्ष उत्तर प्रदेशातील निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील सर्वात प्रबळ असणाऱ्या आणि राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्या ममता बॅनर्जी मात्र तृणमूल काँग्रेसला उत्तर प्रदेशात निवडणूक मैदानात उतरवण्या ऐवजी अखिलेश यादव यांना सर्व जागांवर पाठिंबा देत आहेत.
यातच तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या राजकीय नेतृत्वाचे वेगळे वैशिष्ट्ये दिसत आहे. येत्या 8 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशात लखनऊ, वाराणसी मध्ये अखिलेश यादव यांच्याबरोबर त्या संयुक्त पत्रकार परिषद घेतील, अशी माहिती किरणमय नंदा यांनी दिली आहे.
किरणमय नंदा हे समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते असून ते पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडी सरकारमध्ये अनेक वर्षे मंत्री राहिले आहेत. परंतु आता समाजवादी पक्ष डावे आघाडीत राहिलेला नाही, तर त्याने ममता बॅनर्जी यांच्याबरोबर जुळवून घेतले आहे आणि त्यादृष्टीने ममता बॅनर्जी येत्या 8 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत.
Trinamool supports Samajwadi in Uttar Pradesh; Mamata – Akhilesh Joint Press Conference on 8th February
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेशी आघाडी??; ठाण्यात राष्ट्रवादीतच बेदिली!! जितेंद्र आव्हाड – नजीब मुल्ला यांच्यातील बेबनाव समोर!!
- अनिल देशमुखांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला; तुरूंगातील मुक्काम वाढला
- छत्तीसगड : मर्जुम गावातील डोंगरात ४० नक्षलवादी जमल्याची माहिती , नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक ; एक नक्षलवादी ठार
- शिवसेना – राष्ट्रवादी महाराष्ट्रात काँग्रेस कमजोर करताहेत; काँग्रेस नेत्याचे सोनियांना पत्र!!