• Download App
    सीबीआयचा छापा सुरू असताना तृणमूल आमदाराने तळ्यात फेकले फोन, आता पंप लावून रिकामा करत आहेत तलाव|Trinamool MLA threw phone in lake while CBI raid, now pump is being used to empty lake

    सीबीआयचा छापा सुरू असताना तृणमूल आमदाराने तळ्यात फेकले फोन, आता पंप लावून रिकामा करत आहेत तलाव

    वृत्तसंस्था

    कोलकाता : CBIने शुक्रवारी पश्चिम बंगालचे टीएमसी आमदार जीवन कृष्णा साहा यांच्या घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांनी त्यांचे दोन मोबाइल जवळच्या तलावात फेकून दिले. आता CBI दोन्ही फोनचा शोध घेत आहे. त्यासाठी ते पंप लावून तलावातील पाणी उपसून काढत आहेत.Trinamool MLA threw phone in lake while CBI raid, now pump is being used to empty lake

    शिक्षक भरतीच्या कोट्यवधींच्या घोटाळ्यात CBI ने शुक्रवारी दुपारी एक वाजता मुर्शिदाबाद येथील TMC आमदाराच्या घरावर छापा टाकला होता. यादरम्यान आमदार वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने ते उठले आणि घराबाहेर पळून गेले. CBI अधिकारी त्यांना पकडण्याआधीच त्यांनी त्यांचे फोन घराजवळील तलावात फेकून दिले.



    पंप बसवून तलावातील पाणी काढत आहेत अधिकारी

    CBIने कालपासूनच तलावातील फोन शोधण्यास सुरुवात केली होती. यावेळी फोन सापडले नाहीत, मात्र 6 बॅगा सापडल्या. यानंतर CBIने तलावातील पाणी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी पंपही बसवला. तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी शनिवारी सकाळी आणखी दोन पंप बसविण्यात आले होते.

    खटल्यासाठी फोन सापडणे गरजेचे

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, CBIला हे दोन फोन परत मिळणे महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्यामध्ये घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे सापडू शकतात. CBIने छाप्यात अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. यामध्ये विविध स्तरांवरील विविध लेखी परीक्षांच्या प्रवेशपत्रांचा समावेश आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक डायरीही सापडली आहे, ज्यामध्ये घोटाळ्यादरम्यान जमा झालेल्या पैशांचा उल्लेख असू शकतो.

    एजंटच्या माध्यमातून साहापर्यंत पोहोचली CBI

    तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या कुंतल घोष या युवा नेत्याच्या चौकशीदरम्यान CBIला कौशिक घोष नावाच्या एजंटची माहिती मिळाली. कौशिक यांना मुर्शिदाबाद जिल्ह्यात असे लोक सापडायचे जे सरकारी शिक्षक होण्यासाठी मोठी लाच देऊ शकतात. CBIला कौशिककडून समजले की, जीवन साहादेखील या प्रकरणात सामील होता, त्यानंतर एजन्सीने त्याच्या घरावरही छापा टाकला.

    Trinamool MLA threw phone in lake while CBI raid, now pump is being used to empty lake

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट