• Download App
    पंतप्रधानांच्या मोरबी दौऱ्याबाबत फेक न्यूज ट्विट; तृणमूल काँग्रेस प्रवक्ते साकेत गोखले गुजरात पोलिसांकडून अटकेत Trinamool Congress spokesperson Saket Gokhale arrested by Gujarat police

    पंतप्रधानांच्या मोरबी दौऱ्याबाबत फेक न्यूज ट्विट; तृणमूल काँग्रेस प्रवक्ते साकेत गोखले गुजरात पोलिसांकडून अटकेत

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरबी दौऱ्याबद्दल फेक न्यूज ट्विट करणारे तृणमूल काँग्रेसचा प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी राजस्थानातल्या जयपूर मधून अटक केली आहे.  Trinamool Congress spokesperson Saket Gokhale arrested by Gujarat police

    मोरबी पुल दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनास्थळाला भेट दिली. त्याचा खर्च 30 कोटी रुपये झाला. त्यापैकी फक्त 5.5 कोटी स्वागत समारंभासाठी खर्च केले, अशी खोटी बातमी साकेत गोखले यांनी स्वतःच्या ट्विटर हँडल वर शेअर केली होती. त्याचवेळी मोरबी दुर्घटनेत 135 जणांचा बळी गेला. त्यापैकी प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकाला 4 लाख रुपये वाटले. म्हणजे एकूण 5 कोटी रुपये वाटले. पण पंतप्रधानांच्या स्वागत समारंभावर 5 कोटी रुपये खर्च केले, असा दावा एका गुजराती वर्तमानपत्राने केला होता. हीच बातमी साकेत गोखले यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर करून पंतप्रधानांच्या मोरबी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.


    Narendra Modi Speech : पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरून बापू, बोस, आंबेडकर, वीर सावरकरांना विनम्र अभिवादन!!


     

    प्रत्यक्षात पीआयबी या बातमीचे फॅक्ट चेक करून खातरजमा केली, तेव्हा प्रत्यक्षात असे काहीही नसल्याचे स्पष्ट झाले. साकेत गोखले यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून संबंधित खोटी बातमी पसरवली या आरोपाखाली गुजरात पोलिसांनी त्यांना काल जयपूर मधून अटक केली आहे. मात्र, तृणमूळ काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी या मुद्द्यावर कांगावा केला आहे. मोरबी दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांना अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून साकेत गोखले यांना अटक केल्याचा दावा करून गुजरात पोलिसांची ही कारवाई सूडबुद्धीने असल्याचा आरोपही डेरेक ओब्रायन यांनी केला.

    साकेत गोखले काल दिल्लीहून जयपूरला आले आणि मध्यरात्री पोलिसांनी त्यांना अटक केली साकेत गोखले यांनी फोनवरून आपल्या आईला स्वतःच्या अटकेची बातमी सांगितली असेही डायरेक्ट ओबरायन यांनी म्हटले आहे.

    Trinamool Congress spokesperson Saket Gokhale arrested by Gujarat police

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!