वृत्तसंस्था
कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती महुआ मोईत्रा यांच्या लाचखोरीतून लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या घोटाळ्यातून तृणमूळ काँग्रेसने हात झटकले आहेत. महुआ मोईत्रांच्या प्रकरणाशी तृणमूळ काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यावर आमची कोणतीही कमेंट नाही. संबंधित व्यक्तीच त्यावर खुलासा देऊ शकेल, असे परखड बोल तृणमूळ काँग्रेसचे महासचिव कुणाल घोष यांनी ऐकविले. Trinamool Congress shakes hands from MP Mahua Moitra question scam
गौतम अदानी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलीन करण्यासाठी तृणमूळ काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत काही प्रश्न उपस्थित केले होते, मात्र हे प्रश्न त्यांनी लाचखोरी करून मुद्दामून विचारले, असा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आणि त्या संदर्भातले काही पुरावे त्यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे दिले. त्यानंतर हे प्रकरण जास्त वाढले.
या प्रकरणात नाव आलेला बिझनेसमन दर्शन हिरानंदानी याने एक प्रतिज्ञापत्र सादर करून महुआ मोईत्रा यांनी लाच घेऊनच प्रश्न विचारले याची खातरजमा करून दिली. महुआ मोईत्रा यांनी आपल्याला त्यांचे पर्सनल लॉगिन आयडी वापरायला दिले होते. त्यावरून आपण थेट लोकसभा पोर्टलवर प्रश्न पाठवत होतो. महुआ मोईत्रांच्या काही फॉरेन ट्रिप साठी आपण पैसे दिले, इतकेच नाही तर त्यांच्या दिल्लीतल्या बंगल्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी देखील खर्च केला, असे दर्शन हिरानंदानी याने त्या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे.
महुआ मोईत्रा स्वतः भारतात असताना त्यांचे लॉगिन आयडी दुबईतून देखील ऑपरेट झाल्याचा नवा आरोप खासदार निशिकांत दुबे यांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर महुआ मोईत्रा आता पूर्णपणे कायद्याच्या कचाट्यात अडकल्या आहेत. त्यामुळेच तृणमूळ काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणातून आपले हात झटकून महुआ मोईत्रा यांना एकटे पाडले आहे.
Trinamool Congress shakes hands from MP Mahua Moitra question scam
महत्वाच्या बातम्या
- झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची ओडिशाच्या राज्यपाल पदावर नियुक्ती
- मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन, प्रत्येक केंद्रात १०० तरुणांना मिळणार प्रशिक्षण
- पवारांचा पॅलेस्टिनींना पाठिंबा; पवार आता सुप्रियांनाच हमासच्या बाजूने लढायला पाठवतील; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा टोला!!
- WATCH : कर्नाटकात काँग्रेस मंत्र्यांच्या उपस्थितीत हवेत उडवल्या नोटा; भाजपची टीका- जनतेच्या लुटलेल्या पैशांनी