• Download App
    Mahua Moitra तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केले लग्न

    Mahua Moitra : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केले लग्न

    ‘या’ दिग्गज नेत्यासोबत बांधली लग्नगाठ Mahua Moitra

    विशेष प्रतिनिधी

    पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचे लग्न बिजू जनता दलाचे (बीजेडी) नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी झाले आहे. Mahua Moitra

    राजकारणातील दोन्ही दिग्गजांनी जर्मनीमध्ये लग्न केले. असे सांगितले जात आहे की दोन वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या महुआ मोइत्रा यांचे लग्न ३ मे रोजी झाले.

    महुआ यांचे पती पिनाकी मिश्रा हे ओडिशातील पुरी येथून खासदार होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संबित पात्रा यांनी त्यांचा पराभव केला होता.



    महुआ मोइत्रा यांचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्यांनी डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सनशी लग्न केले होते, ज्यांच्यापासून त्यांनी घटस्फोट घेतला होता. महुआ मोइत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचल्या आहेत. त्या पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

    खासदार होण्यापूर्वी महुआ आमदार होत्या. त्यांनी २०१६ ते २०१९ पर्यंत पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले, करीमपूरचे प्रतिनिधित्व केले.

    महुआ मोइत्रा यांचे गुप्त लग्न सुमारे एक महिन्यापूर्वी ३ मे रोजी झाले होते, परंतु त्यांनी त्याबद्दल मौन बाळगले होते. जर्मनीतील फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या लग्नाचे गूढ उघड झाले. कृष्णा नगरच्या खासदार महुआ ५० वर्षांच्या आहेत तर त्यांचे दुसरे पती पिनाकी मिश्रा ६५ वर्षांचे आहेत.

    Trinamool Congress MP Mahua Moitra secretly marries for the second time

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rakesh Kishor : CJI हल्ला; आरोपी वकिलाचे बार असोसिएशन सदस्यत्व रद्द, बंगळुरूमध्ये FIR

    नोबेल समितीने हिरावला उतावळ्याचा पुरस्कार; पण वाचा नोबेल ecosystem चा चमत्कार!!

    Mayawati : यूपीमध्ये मायावतींकडून योगी सरकारचे कौतुक; सपाला म्हटले दुटप्पी पार्टी; लखनऊमध्ये 9 वर्षांनंतर सभा