• Download App
    तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर लैंगिक छळ आणि जमीन बळकावल्याचा आरोप; राज्यपाल म्हणाले - हा भयंकर आणि धक्कादायक प्रकार Trinamool Congress leader accused of sexual harassment and land grabbing

    तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर लैंगिक छळ आणि जमीन बळकावल्याचा आरोप; राज्यपाल म्हणाले – हा भयंकर आणि धक्कादायक प्रकार

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील महिलांनी TMC नेते शेख शाहजहान आणि त्यांच्या समर्थकांवर लैंगिक छळ आणि जबरदस्तीने जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. यावरून सोमवारी विधानसभेत भाजप आमदारांनी गदारोळ केला. ईडी टीमवर हल्ला केल्याचा आरोप खुद्द शाहजहान यांच्यावर आहे. Trinamool Congress leader accused of sexual harassment and land grabbing

    विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, अग्निमित्र पॉल, मिहिर गोस्वामी, बंकिम घोष, तापसी मंडल आणि शंकर घोष यांना तृणमूल सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याबद्दल असंसदीय वर्तन केल्याच्या आरोपावरून विधानसभेच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले.

    दुसरीकडे, पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस सोमवारी सकाळी केरळहून कोलकाता येथे पोहोचले आणि थेट उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथे गेले. बोस म्हणाले की, संदेशखळीतील परिस्थिती भयावह आणि धक्कादायक आहे. बोस जेव्हा संदेशखळी येथे पोहोचले तेव्हा टीएमसी समर्थकांनी हातात बॅनर घेऊन त्यांच्याविरोधात निदर्शने केली. बोस यांनी संदेशखळीबाबत राज्य सरकारकडून अहवालही मागवला आहे.



    संदेशखळी येथे काय घडले?
    वास्तविक गेल्या काही दिवसांपासून संदेशखळी येथे स्थानिक महिला आंदोलन करत आहेत. त्यांनी TMC नेते शेख शाहजहान आणि त्यांच्या साथीदारांवर जबरदस्तीने त्यांच्या जमिनींवर कब्जा केल्याचा आरोप केला आहे. शेख शहाजहानच्या अटकेची मागणीही महिलांनी केली आहे. त्यांनी TMCचे दुसरे नेते शिवप्रसाद हाजरा यांच्या शेतात आणि फार्म हाऊसला आग लावली होती.

    पोलीस काय म्हणाले?
    संदेशखळी घटनेबाबत बंगाल पोलिसांचे म्हणणे आहे की, तेथील परिस्थिती शांततापूर्ण आहे. तिथून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, आम्ही कोणालाही तेथील कायदा व सुव्यवस्था बिघडवू देणार नाही आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करू.

    पश्चिम बंगालमध्ये कोरोनादरम्यान झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या कथित रेशन घोटाळ्याच्या संदर्भात 5 जानेवारी रोजी ईडीने राज्यातील 15 ठिकाणी छापे टाकले होते. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी गावात शेख शाहजहान आणि शंकर अध्याय यांच्या घरांवरही छापा टाकण्यासाठी ही टीम गेली होती. यावेळी त्यांच्यावर टीएमसी समर्थकांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये तीन अधिकारी जखमी झाले. तेव्हापासून शहाजहान फरार आहेत. शेख शाहजहान यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.

    Trinamool Congress leader accused of sexual harassment and land grabbing

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले