• Download App
    "हर घर तिरंगा" : कोट्यावधी घरांवर फडकले तिरंगे; काँग्रेस, कम्युनिस्ट, राष्ट्रवादी सोशल मीडियावर "थंड"!!Tricolor hoisted on crores of houses; Congress, Communist, Nationalist on social media

    “हर घर तिरंगा” : कोट्यावधी घरांवर फडकले तिरंगे; काँग्रेस, कम्युनिस्ट, राष्ट्रवादी सोशल मीडियावर “थंड”!!

    विनायक ढेरे

    नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात “हर घर तिरंगा” मोहिमेत देशभरातल्या आणि परदेशातल्या कोट्यावधी घरांवर तिरंगा डौलाने फडकला आहे. पण देशातले विरोधी पक्ष काँग्रेस, कम्युनिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्ष सोशल मीडियावर पूर्णपणे “थंड” आहेत. Tricolor hoisted on crores of houses; Congress, Communist, Nationalist on social media

    अपवाद फक्त काँग्रेसचा आहे आणि तो देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाने स्वातंत्र्य कसे गमावले आहे?, याचे व्हिडिओ टाकण्यावर पक्षाने भर दिला आहे. त्याच वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र नागपूर मध्ये आजादी गौरव यात्रेत सहभागी झाल्याचे दिसले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर या आजादी गौरव यात्रेचा फोटो शेअर केले असून काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या गौरव यात्रेत सहभाग नोंदवल्याचे नमूद केले आहे.

    काँग्रेसच्या मुख्य ट्विटर हँडलवर मात्र देशाने अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्य कसे गमावले? सध्या स्वातंत्र्याची कशी गळचेपी सुरू आहे?, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या युवकांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची काँग्रेसने ही नकारात्मक दखल घेतली आहे. काहीच दिवसांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा तिरंगा फडकवणारा फोटो शेअर करून मूळ तिरंग्याचे श्रेय पंडितजींचे आहे, असे काँग्रेसने दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून सध्याच्या मोदी सरकारच्या काळात स्वातंत्र्याची गळचेपी कशी सुरू आहे?, याविषयीचे व्हिडिओ पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून शेअर केले आहेत.

     

     

     

     

    कम्युनिस्टांकडून दखल नाही

    पण त्या पलिकडे कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मात्र सोशल मीडियावर पूर्णपणे “थंड” आहेत. किंबहुना भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे याचा मागमूसही या दोन्ही या तीनही पक्षांच्या ट्विटर हँडलवर आढळत नाही. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटरवर काहीही टाकलेले नाही, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे स्वागत करण्याचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर अद्याप 13 ऑगस्ट रोजी दुपारी 1.00 वाजता वाजेपर्यंत त्यांनी काहीही शेअर केलेले नाही.

    राष्ट्रवादीचेही दुर्लक्ष

    राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटरवर “हर घर तिरंगा” मोहिमेचा उल्लेखही केलेला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहिल्याबाई होळकर, आचार्य अत्रे यांना आदरांजली वाहणारी ट्विट केले आहेत. परंतु स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा उल्लेख त्यांच्यावर अद्याप नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र आपल्या ट्विटर वरचा डीपी तिरंगा केला आहे. एकीकडे देशातील जनता “हर घर तिरंगा” मोहिमेला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कोट्यावधी घरांवर झेंडा फडकवत असताना विरोधक मात्र या मोहिमेत सहभागी न होता आपला कृतकपणा दाखवून देत आहे हेच यातून स्पष्ट झाले आहे.

    Tricolor hoisted on crores of houses; Congress, Communist, Nationalist on social media

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य