• Download App
    'इच्छा तेथे मार्ग'! ओडिसातील आदिवासी मुलीने विहिर खोदून गावातील पाण्याची समस्या सोडवली | Tribal girl in odisha solves water problem in her village by digging a well

    ‘इच्छा तेथे मार्ग’! ओडिसातील आदिवासी मुलीने विहिर खोदून गावातील पाण्याची समस्या सोडवली

    विशेष प्रतिनिधी

    मलकानगिरी: ओडिशातील मलकानगिरी येथील मालती सिसा हिने आपल्या कुटुंबाबरोबर गावातील अनेक समस्यांचा सामना केला आहे. लहानपणापासूनच खूप संघर्ष करीत मालतीने अनेक अडचणींचा सामना करून आपले एम.ए. शिक्षण पूर्ण केले.

    Tribal girl in odisha solves water problem in her village by digging a well

    ‘इच्छा तेथे मार्ग’ या म्हणीनुसर ओडिसातील आदिवासी मुलगी मालती सीसा हिने असंभव संभव करून दाखवले आहे. मालती आपल्या कुटुंबाबरोबर बोंडाघाटीमध्ये बांदीगुडा या गावात राहते. बांदीगुडा हे पहाडी क्षेत्र असल्यामुळे तिथल्या रहिवाशांना कायम पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ट्यूब वेल आणि सार्वजनिक स्टँड पोस्ट निर्माण करूनही तिथे पाण्याची कमतरता आहे. आपल्या कुटुंबाची तहान व तसेच आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एका पाण्याच्या झऱ्यापर्यंत खूप लांब चालत जावे लागते.


    पन्नास वर्षे सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते ; मात्र बारामतीतील २४ गावे तहानलेलीच, शेती, पिण्याचा प्रश्न ‘जैसे थे’च : गोपीचंद पडळकर


    कोविडच्या काळात लॉकडाऊनमध्ये गावात परत आल्यानंतर मालतीने ही समस्या सोडविण्याचा निश्चय केला. मालतीने सांगितले कि तिने तिच्या तीन बहिणींच्या मदतीने विहिर खोदण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सलग दहा-बारा दिवस खूप कष्ट करून असंभव वाटणारे काम संभव करून दाखवले आणि त्या विहिर खोदण्यात यशस्वी झाल्या. ही विहिर आता पाण्याने पूर्ण भरलेली आहे. या विहिरीचा उपयोग फक्त तहान भागविण्यासाठी होत नसून गावातील लोकांनी सिंचन पाईप आणि पाण्याचा पंप जोडून भाज्यांची लागवड करायलाही सुरुवात केली आहे. मालतीच्या या मिशनची प्रेरणा घेऊन कुठल्याही सरकारी मदतीशिवाय गावातील इतर युवकांनीही विहिर खोदण्याचे काम सुरू केले आहे. तिच्या वडिलांनी सांगितले की या विहिरीचा आमच्या गावाबरोबरच इतर ग्रामीण लोकांनाही लाभ होत आहे.

    Tribal girl in odisha solves water problem in her village by digging a well

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!

    Air India : एअर इंडियाने जारी केली अ‍ॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द