वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम : सोशल मीडियावर एका महिला पत्रकारावर अभद्र टिप्पणी केल्याप्रकरणी माजी न्यायाधीश एस. सुदीप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपन्यायाधीश पदावर असताना सुदीप यांनी सबरीमाला प्रकरणाबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या.Trial of ex-judge who made indecent comment on female journalist; Comment on Sabarimala, had to leave the post
याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणावर सुनावणी करताना सुदीप यांना उच्च न्यायालयाने फटकारले होते, त्यानंतर त्यांना जून 2021 मध्ये पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
मीडिया संस्थेने एशियानेट न्यूजने आपल्या साप्ताहिक कार्यक्रमात या विषयावर वृत्त दिले होते. संस्थेने या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर माजी न्यायमूर्तींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या पत्रकारावर अशोभनीय टिप्पणी केली.
सोशल मीडियावर युजर्सनी त्याच्या कमेंटचा विरोध सुरू केला. यानंतर केरळ पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली
केरळच्या कॅन्टोन्मेंट पोलिसांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, माजी न्यायाधीशांविरुद्ध लैंगिक टिप्पणी केल्याबद्दल आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला पुढील आठवड्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.
Trial of ex-judge who made indecent comment on female journalist; Comment on Sabarimala, had to leave the post
महत्वाच्या बातम्या
- ‘’तीन महिन्यांत देशभरात खेलो इंडियाची एक हजार केंद्र सुरू होणार’’, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा!
- रोहित पवार शरदनिष्ठांसाठी “संजय राऊतांच्या” भूमिकेत; पण प्रचार प्रमुख डॉ. अमोल कोल्हे आहेत कुठे??
- उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये मोहरमच्या सुट्ट्या रद्द, योगी सरकारने जारी केले आदेश
- अतिक अहमदचा नातेवाईक मोहम्मद अहमदला अटक; खंडणी आणि मारहाण प्रकरणी पोलिसांची कारवाई