• Download App
    संत्र्याच्या बागेमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार , मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना ; फांद्यांना सलाईनच्या बाटल्या लटकवून रुग्णांना ग्लुकोज Treatment of corona patients in the orange orchard

    संत्र्याच्या बागेमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार , मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना ; फांद्यांना सलाईनच्या बाटल्या लटकवून रुग्णांना ग्लुकोज

    वृत्तसंस्था

    भोपाळ : संत्र्याच्या बागेमध्ये एका बनावट डॉक्टरने कोरोना रुग्णांवर उपचार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील आगर मालवा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. Treatment of corona patients in the orange orchard

    एका बनावट डॉक्टरने बागेतील झाडांच्या फांद्यांना सलाईन लटकवून तो महिला रुग्णांना ग्लुकोजही देत होता. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोचले. तेव्हा तो डॉक्टर पळून गेला.

    बागेतील झाडाखाली कार्डबोर्डची अंथरुण करुन त्यावर महिलांना झोपवले होते. झाडाच्या फांद्यांना लटकवलेल्या सलाईन बाटल्यातून ग्लुकोज देण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांना दिसले. तसेच सीरिंज आणि औषधांची अर्धवट जळालेली बिलंही सापडली.



    कोरोनाची चाचणी करून रुग्णालयात दाखल करतील अशी भीती ग्रामीण भागातील जनतेला आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात बनावट डॉक्टरांचे फावले आहे. अशा डॉक्टरकडून उपचार नागरिक करत आहेत.

    दरम्यान, अशा डॉक्टरांवर कारवाई केली जात असून रुग्ण जरी आले तर त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवून द्यावे, असे आवाहन अधिकाऱ्यानी केले.

    Treatment of corona patients in the orange orchard

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Golden Temple : सुवर्ण मंदिरावर पुन्हा बॉम्ब हल्ल्याची धमकी; 24 तासांत आणखी एक ई-मेल

    PM Kisan : किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता; PM मोदी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात करणार ट्रान्सफर

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन: बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक; सरकारकडून 7 महत्त्वाची विधेयके सादर होणार