विशेष प्रतिनिधी
मुंबई: IIFL Wealth Hurun India Rich ने जाहीर केलेल्या यादीनुसार मुकेश अंबानी यांनी यावेळीसुद्धा पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यापाठोपाठ मित्तल, दिलीप सांगवी, कुमार मंगलम बिर्ला आणि शिव नादर ही नावे आहेत.
१: मुकेश अंबानी: गेली दहा वर्ष मुकेश अंबानी हेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे पद भूषवत आहेत. त्यांची एकूण संपत्ती ७ लाख १८ हजार कोटी रुपये एवढी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील अशी पहिली रिटेल आणि टेलिकॉम ऑपरेशन कंपनी आहे, जिने २०० बिलियन डॉलर्सचे भांडवल पार केले आहे.
२: गौतम अदानी: गौतम अदानी अँड फॅमिली यांनी ५ लाख ५ हजार ९०० कोटींच्या संपत्तीसह या यादीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. अदानी ग्रुपचे मार्केट कॅपिटल हे ९ लाख कोटी रुपये इतके आहे.
३: शिव नादर: HCL कंपनीचे शिव नादर हे तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. कोरोना काळात ट्रॅव्हल, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांवर झालेल्या परिणामांमुळे त्यांच्या संपत्तीमध्ये 67 टक्के वाढ झाली आहे. २३६६०० कोटी रुपये एवढी संपत्ती असलेली HCL कंपनी ही तिसरी अशी भारतीय आयटी कंपनी आहे जिने US १० बिलियन डॉलर्सचा रेवेन्यू पार केला आहे.
४: एस पी हिंदुजा आणि फॅमिली: हिंदजजा फॅमिली २ क्रमांक खाली उतरून चौथ्या क्रमांकावर आली आहे. हिंदूजा फॅमिलीचे उत्पन्न ५३ टक्क्यांनी वाढून 2 लाख 20 हजार कोटी रुपये इतके झाले आहे.
५: लक्ष्मी मित्तल: लक्ष्मी मित्तल यावेळी ८व्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर आले आहेत. त्यांची संपत्ती १७४४०० कोटी इतकी आहे. बांधकाम, पायाभूत सुविधा, नूतनीकरण तसेच ऊर्जा क्षेत्राकडून असलेल्या प्रचंड मागणीमुळे मित्तल यांच्या शेअर्सच्या किमतीत तिप्पट वाढ झालेली आहे.
६: सायरस पूनावला: सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांनी या यादीमध्ये सहावा क्रमांक पटकावला आहे. ६० कोटी लसिंचे डोस उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या संपत्तीमध्ये ७४% वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती १ लाख ६३ हजार ७०० कोटी रुपये इतकी आहे.
७: राधाकृष्ण दमानी: १५४३०० कोटीच्या संपत्तीचे मालक अवेन्यू सुपरमर्टसचे राधाकृष्ण दमानी यांनी या यादीमध्ये सातवा क्रमांक पटकावला आहे.
८: विनोद शांतीलाल अदानी: १३१६०० कोटी संपत्ती असलेले विनोद शांतीलाल अदानी अँड फॅमिली हे बाराव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर आले आहेत.
९: कुमार मंगलंम बिरला: आदित्य बिरला ग्रुपचे कुमार मंगलम बिरला यांची संपत्ती १२२२०० कोटी रुपये इतकी आहे. आदित्य बिर्ला ग्रुपच्या कॅपिटल मध्ये ८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
१०: जय चौधरी: या यादीच्या दहाव्या क्रमांकावर क्लाऊड सिक्युरिटी ‘zscaler’ कंपनीचे मालक जय चौधरी आहेत. त्यांची संपत्ती २८१००० कोटी रुपये इतकी आहे. सायबर सेक्युरिटी सर्विसेस मधील वाढत्या मागणीमुळे त्यांच्या संपत्तीमध्ये ८५ टक्के वाढ झालेली आहे आणि त्यांनी दहावा क्रमांक पटकावला आहे.