जाणून घ्या टोमॅटोच्या भावात का आली मोठी घट
विशेष प्रतिनिधी
इंदुर : काही दिवसांपूर्वी टोमॅटोचा भाव देशात 200 रुपये किलोवर पोहोचला होता. देशातील बहुतांश ठिकाणी टोमॅटो 180 ते 200 रुपये किलोने विकले जात होते. मात्र, आठवडाभरात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोचे दर 200 रुपये किलोवरून 14 रुपये किलोवर आले आहेत. Tomato Price Within a week the price of tomatoes dropped from Rs 200 per kg to Rs 14 per kg
टोमॅटोच्या दरात एवढी मोठी घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. म्हैसूरमध्ये टोमॅटोचा भाव शनिवारी 20 रुपये होता आणि रविवारी तो 14 रुपये किलोवर आला. रविवारी बंगळुरूच्या बाजारात टोमॅटोचा किरकोळ भाव ३० ते ३५ रुपये किलो होता. आगामी काळात टोमॅटोचे भाव आणखी खाली येऊ शकतात, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचा भाव 5 ते 11 रुपये किलोपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. म्हैसूर एपीएमसीचे सचिव कुमारस्वामी सांगतात की टोमॅटोच्या पुरवठ्याने किंमत कमी होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
देशभरात टोमॅटोच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याने बाजारात टोमॅटोची मागणी घटली होती. यानंतर सरकारने नेपाळमधून मोठ्याप्रमाणावर टोमॅटोची आयात केल्याने टोमॅटोचे भाव घसरले आहेत. याशिवाय बंगळुरू आणि इतर भागातून टोमॅटोचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आणि टोमॅटोचे भाव कमी करण्यात सरकारने मोठी भूमिका बजावली आहे. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये सरकार कमी दराने टोमॅटो विकत आहे. त्याचबरोबर कांद्याचे भाव कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत.
Tomato Price Within a week the price of tomatoes dropped from Rs 200 per kg to Rs 14 per kg
महत्वाच्या बातम्या
- प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक डॉ. गौरी लाड यांचे दुःखद निधन
- ”KCRच्या गाडीचं स्टेअरिंग ओवेसींच्या हाती, तर काँग्रेस हा ‘4जी’ पक्ष” – तेलंगणात अमित शाहांनी साधला निशाणा!
- बीडच्या सभेत छगन भुजबळ फुटले; शरद पवारांवर धुवाँधार बरसले!!
- शासन आपल्या दारी योजनेत परभणी जिल्ह्यात 8.50 लाख लाभार्थींना 1500 कोटींचा लाभ!!